Mumbai News : तब्बल 80 वर्षांनी मिळाला महिलेला आपल्या हक्काच्या घराचा ताबा

Mumbai News
Mumbai NewsSakal
Updated on

मुंबई : मुंबईतील एका महिलेला आपल्या हक्काचे दोन फ्लॅट तब्बल 80 वर्षांनी परत मिळाले आहेत. अ‍ॅलिस डिसूझा असं या महिलेचं नाव असून 500sqft आणि 600sqft क्षेत्रफळांचे हे फ्लॅट आहेत. 1942 मध्ये ताबा दुसऱ्याकडे गेलेला फ्लॅट या महिलेला परत करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

दरम्यान, अ‍ॅलिस डिसूझा यांना परत दिले जाणारे फ्लॅट मेट्रो सिनेमाच्या मागे बॅरॅक रोडवरील रुबी मॅन्शनच्या पहिल्या मजल्यावर आहेत, 28 मार्च 1942 रोजी भारतीय संरक्षण विभागाकडून रुबी मॅन्शनची या इमारतीची मागणी करण्यात आली. पण कालांतराने पहिला मजला वगळता मूळ मालकाला ताबा परत देण्यात आला होता.

Mumbai News
Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

17 जुलै 1946 रोजी, बॉम्बेच्या गव्हर्नरने भारताच्या संरक्षण नियमांतर्गत डिसूझाचे वडील एच. एस. डायस यांना हा परिसर परत करण्याचे निर्देश सरकारी कर्मचारी असलेल्या लाड यांना दिले. 24 जुलै 1946 रोजी जिल्हाधिकार्‍यांनी सुद्धा सदनिका मुक्त करण्याचे निर्देश दिले. पण निर्देश असूनही डायस यांना ताबा देण्यात आला नाही. 21 जून 2010 रोजी, मुंबई जमीन मागणी कायदा, 1948 अन्वये निवास नियंत्रकाने लाड यांचा मुलगा मंगेश आणि मुलगी कुमुद फोंडेकर यांना सदनिका रिकामी करण्याचे निर्देश दिले. तोपर्यंत लाड यांचा मृत्यू झाला होता.

Mumbai News
"तुमचा नशीब, कर्मावर विश्वास नसेल तर हे बघा..."; आनंद महिंद्रांनी शेअर केलेला थरारक Video Viral

26 ऑगस्ट 2011 रोजी प्राधिकरणाने आदेश कायम ठेवले. 2012 मध्ये, लाड यांच्या मुलाने आणि मुलीने उच्च न्यायालयात धाव घेतली. पण 11 एप्रिल 1948 रोजी बॉम्बे लँड रिक्झिशन अ‍ॅक्ट अंमलात आल्याने आणि मागणी रद्द करण्याचे जुलै 1946 चे आदेश पूर्वीचे होते, असे कब्जेदारांची बाजू मांडणारे अधिवक्ता शरण जगतियानी यांनी सादर केलेल्या सबमिशनमध्ये कोणतीही योग्यता नसल्याचे न्यायाधीशांनी सांगितले.

त्यानंतर न्यायमूर्ती रमेश धानुका आणि न्यायमूर्ती मिलिंद साठ्ये यांनी डिसूझा यांना त्यांच्या फ्लॅटचा आठ आठवड्यांच्या आत शांततापूर्ण ताबा देण्याचे निर्देश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.