'म्युकर'नंतर बोन डेथचं संकट; हाडे होतात कमकुवत

'म्युकर'नंतर बोन डेथचं संकट; हाडे होतात कमकुवत
Updated on

जगभरात कोरोना महामारीनं हाहा:कार माजवला आहे. याच्या नवनव्या व्हेरियंटमुळे लोकांच्या संकटात वाढच होत आहे. त्यातच कोरोनामुक्त झाल्यानंतर होणाऱ्या आजारांमुळे लोकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. म्युकरमायकोसिससोबत आणखी एका आजाराने एन्ट्री केली आहे. मुंबईच म्युकरमायकोसिसनंतर मुंबईत बोन डेथ या आजाराचं नवीन संकट उभं राहिलं आहे. कोरोनातून बरं होणाऱ्या या आजाराचा सामना करावा लागत आहे. मुंबईमध्ये बोन डेथचे (Avascular necrosis- AVN) तीन रुग्ण आढळले आहेत. बोन डेथला अॅव्हैस्कुलर नेक्रोसिस असेही म्हटलं जाते.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार, मुंबईच्या माहिम येथील हिंदुजा रुग्णालयात बोन डेथच्या तीन रुग्णावर उपचार करण्यात आले आहेत. या सर्वांचं वय 40 पेक्षा कमी आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर दोन महिन्यात बोन डेथ हा आजार झाल्याचं समोर आलं आहे. बोन डेथ या आजारांमध्ये हाडं निकामी होतात. शरिरातील रक्ताभिसरण व्यवस्थित होत नाही. हे प्रामुख्यानं या आजाराची लक्षणं आहेत. डॉक्टरांच्या मते, भविष्यात बोन डेथ या आजाराचे रुग्ण वाढू शकतात.

'म्युकर'नंतर बोन डेथचं संकट; हाडे होतात कमकुवत
Covishield लस घेतली असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच...

हिंदुजा रुग्णालयाचे डायरेक्टर डॉ. संजय अग्रवाल (Dr Sanjay Agarwala) बोन डेथ या आजाराबाबत म्हणाले की, रुग्णांना मांडीच्य हाडाला प्रंचड वेदना झाल्या. बोन डेथ झालेले तिन्ही रुग्ण पेशानं डॉक्टर आहेत. लक्षणं दिसताच या रुग्णांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतल्यामुळे उपचार लगेच झाला. दरम्यान, म्युकरमायकोसिस आणि बोन डेथ या आजारांमध्ये स्टारॉयड्स प्रमुख कारण आहे. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी स्टारॉयड्सचा वापर सर्सार केला जात आहे. याचाच फटका बसत असल्याचं बोललं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.