कोरोनानंतर आरएसव्ही व्हायरसची भीती, काय आहेत 'या' आजाराची लक्षण

'हा आरएसव्ही व्हायरस नियंत्रणात येऊ शकतो. कुठलाही ताप असला, तरी उपचार घेणं आवश्यक आहे'
Pune fever
Pune feverSakal
Updated on

मुंबई: कोरोनानंतर (Corona) आरएसव्ही व्हायरसची (Rsv virus) लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढण्याची भीती महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (Suresh kakani) यांनी व्यक्त केली आहे. "मान्सून संपला असला, तरी काही भागात पाऊस पडतो आहे. आरएसव्ही व्हायरस हा वातावरणातील बदलामुळे व्हायरल फिव्हरचा प्रकार आहे" असे काकाणी म्हणाले.

"हा आरएसव्ही व्हायरस नियंत्रणात येऊ शकतो. कुठलाही ताप असला, तरी उपचार घेणं आवश्यक आहे. हा जीवघेणा व्हायरस नाही. वेळीच उपचार घेणं आवश्यक आहे" असे काकाणी म्हणाले.

Pune fever
मेहुणीविरोधात ड्रग्ज केस, समीर वानखेडेंनी दिलं उत्तर

आरएसव्ही हा कोरोनासारखा जीवघेणा व्हायरस नाही, असे काकाणी यांनी स्पष्ट केले. त्वचेला खाज येणे, ताप, खोकला ही आरएसव्हीची लक्षणे आहेत. कोविडचा रिपोर्ट निगेटीव्ह असला तरी इतर वातावरण बदलानं व्हायरसची लागण होण्याचा संभव जास्त आहे. मुंबईकर सध्या वातावरण बदलामुळे ताप-खोकल्यानं बेजार आहेत, असे काकाणी म्हणाले. मुंबईकरांनी लक्षणे दिसताच कोरोनासोबतच इतर व्हायरसचीही चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()