CSMT नंतर इतर स्थानकांमध्ये आधुनिक दिशादर्शक फलक व चिन्हांची सुविधा !

सीएसएमटी येथे उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांचा प्लॅटफॉर्म क्रमांक दर्शविणारे मोठे फलक
csmt
csmtSakal
Updated on

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्रवाशांना सोईसाठी अत्याधुनिक दिशादर्शक फलक व चिन्हांची सुविधा अलीकडेच सुरु केली आहे. त्याच प्रमाणे इतर महत्वाच्या स्थानकांमध्येही असे फलक आणि चिन्ह बसविण्यात येणार असून यासाठी १.७४ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. या कामासाठी मध्य रेल्वेने निविदा मागवल्या आहे.

सीएसएमटी येथे उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांचा प्लॅटफॉर्म क्रमांक दर्शविणारे मोठे फलक आहे. ज्यामुळे प्रवाशांना सहजपणे लांब अंतरावरून प्लॅटफॉर्म समजू शकतात. सीएसएमटी हे सर्वात व्यस्त स्थानकांपैकी एक आहे जिथून दररोज लाखो प्रवासी ट्रेनमधून ये-जा करतात. सीएसएमटीच्या उपनगरी झोनमध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक १ ते ७ आहे आणि तीन दिशादर्शक फलक आहेत.

प्लॅटफॉर्म क्रमांक ८ ते १८ प्लॅटफॉर्म येथे २ दिशादर्शक फलक देण्यात आले आहेत. स्टेशनवर उपलब्ध असलेल्या सुविधांचा कोणालाही सहजपणे वापर करता येतो. त्यामुळे इतर महत्वाच्या स्थानकांमध्येही असे फलक आणि चिन्ह बसविण्यात येणार असून यासाठी १. ७४ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. या कामासाठी मध्य रेल्वेने निविदा मागवल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.