मोठी बातमी - V.V.I.P मलबार हिल परिसरात पावसाने खचला रास्ता, घटनेची शास्त्रीय तपासणी होणार

मोठी बातमी - V.V.I.P मलबार हिल परिसरात पावसाने खचला रास्ता, घटनेची शास्त्रीय तपासणी होणार
Updated on

मुंबई : मुंबईत गेले काही दिवस धुवासधार बारसतोय. या पावसामुळे मलबार हिल परिसरातील रस्त्याचं मोठं नुकसान झालंय. मुसळधार पावसामुळे मलबार हिल येथील रस्ता खचला आहे. मलबार हिल परिसरात अनेक बड्या मंत्र्यांचे बंगले आहेत. हा मुंबईतील व्हिआयपी रस्त्यांपैकी एक रस्ता आहे. दरम्यान खचलेला भाग मलबार हिलचा हा भाग असून त्यामुळे केम्स कॉर्नर ते गिरगाव चौपाटीपर्यतची वाहतूक बंद करण्यात आली आहे.

दक्षिण मुंबईत बुधवारी विक्रमी पाऊस झाला आहे. धुवाधार पावसामुळे पहिल्यांदाच  गिरवाग चौपाटीसारख्या परीसरात पाणी तुंबले होते. मुंबईतील सततच्या पावसामुळे मलबार हिल टेकडीचा काही भाग खचला आहे. परिणामी हॅंगिक गार्डन जवळील रस्त्यालाही तडे गेले आहेत. त्यामुळे यावरील वाहतूक बंद करण्यात आली.

मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सकाळी या रस्त्याची पाहाणी केली. मलबार हीलवर राजभवन, मुख्यमंत्री निवासस्थान तसेच राज्यातील मंत्र्यांची निवासस्थानेे आहेत. तसेच येथेच मुंबईतील सर्वात जूना जलकुंभ आहे. त्यातून संपुर्ण दक्षिण मुंबईला पाणी पुरवठा होतो. 

तत्काळ होणार तपासणी 

मलबार हील मुंबईतील नैसर्गिक टेकडी अलून येथे नेहमीच अतिमहत्वाच्या व्यक्तींची वर्दळ असते. त्यामुळे तात्काळ या घटनेची शास्त्रीय तपासणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

( संकलन - सुमित बागुल )

after effects of massive mumbai rains road at malbar hill collapsed

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.