मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (ncb) आणि प्रवक्ते नवाब मलिक (nawab malik) यांनी समीर वानखेडे (sameer wankhede) मुस्लिम असल्याचा दावा केला आहे. आपण आपल्या मुद्दावर ठाम आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. "एक व्यक्ती फर्जीवाडा करुन सरकारी नोकरी मिळवतो. मी गोष्टी समोर आणल्या, गोष्टी सार्वजनिक केल्या. माझ्यावर पती, पत्नी, वडिल आणि बहिण यांना या सगळ्या प्रकरणात खेचल्याचा आरोप होत आहे मी अशी कुठलीही गोष्ट अभद्र पद्धतीने केलेली नाही" असे मलिक म्हणाले.
"मी जो जन्मदाखला टि्वटरवर शेअर केला होता. मी तो मुद्दा हिंदु-मुस्लिम म्हणून समोर आणला नव्हता. मी माझ्या सार्वजनिक जीवनात धर्माच्या नावार कधीही राजकारण केलेलं नाही. जी व्यक्ती खोटे कागद पत्र देऊन शेड्युल कास्टच्या कोट्यातून जागा मिळवते. जिथे ज्याला खरचं गरज आहे. त्याची जागा स्वतः घेतली" असा आरोप नवाब मलिक यांनी केला.
"जन्म दाखल्याचं मी केलेलं टि्वट खरं आहे. समीर यांचे वडिल ज्ञानदेव यांचं नाव दाऊद वानखेडे आहे" असा दावा मलिक यांनी केला. "मुंबईत ऑनलाइन जन्मदाखला मिळवता येतो. ज्ञानदेव वानखेडे दलित आहेत. त्याच आधारावर त्यांनी नोकरी मिळवली. माझगाव मध्ये राहणाऱ्या महिलेसोबत लग्न केल्यानंतर ते दाऊद खान बनले. त्यांचं संपूर्ण कुटुंब मुस्लिमांसारखं जीवन जगत आहे मी माझ्या बोलण्यावर कायम आहे" असं नवाब मलिक यांनी सांगितलं.
"समीर वानखेडेने बोगस सर्टिफिकेट तयार करून नोकरी मिळवली आहे. केंद्र सरकारकडे याची शहानिशा करण्याची कोणतीही यंत्रणा नाहीय" असे मलिक म्हणाले. "ते प्रमाणपत्र जिल्हाधिकारी कार्यलयातून मिळतं. वानखडे यांनी देखील तसचं मिळवलं आहे. या सर्टिफिकेट वर दलित लोक तक्रार करणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात ही तक्रार दाखल करणार आहेत" असं मलिक म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.