अमित शाहांच्या सहकार खात्यावर संजय राऊतांची सावध प्रतिक्रिया

अमित शाहांच्या सहकार खात्यावर संजय राऊतांची सावध प्रतिक्रिया "सहकार मंत्री म्हणून अमित शाह नक्कीच चांगलं काम करतील. काही गैर घडलं तर..." After NCP Chief Sharad Pawar Sanjay Raut expressed his opinion on Amit Shah Co operation Ministry
अमित शाहांच्या सहकार खात्यावर संजय राऊतांची सावध प्रतिक्रिया
Updated on

"सहकार मंत्री म्हणून अमित शाह नक्कीच चांगलं काम करतील. काही गैर घडलं तर..."

मुंबई: केंद्र सरकाने सहकार मंत्रालयाची नव्याने निर्मिती केली. या मंत्रालयाची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर सोपवण्यात आली. त्यामुळे राज्यातील सहकाराशी संबंधित उद्योगांवर पकड असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणी वाढतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पण, 'या निर्णयाचा महाराष्ट्रातील सहकार चळवळीवर कोणताही परिणाम होणार नाही', असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी काल बारामतीत व्यक्त केला. याच संबंधी महाविकास आघाडीतील महत्त्वाचे नेते संजय राऊत यांनी मात्र काहीशी सावध प्रतिक्रिया दिली. (After NCP Chief Sharad Pawar Sanjay Raut expressed his opinion on Amit Shah Co operation Ministry)

अमित शाहांच्या सहकार खात्यावर संजय राऊतांची सावध प्रतिक्रिया
मनसेच्या Video नंतर विश्वास नांगरे-पाटलांनी लिहिलं पत्र

"अमित शाह यांना सहकाराचा अनुभव आहे. त्यामुळे ते या क्षेत्रात काही तरी चांगलं करतील. सहकार खातं त्यांच्याकडे गेल्याने घाबरण्याचं कारण नाही. आम्ही त्याकडे सकारात्मकतेने पाहतो. केंद्र सरकारने नवं मंत्रालय तयार केलं आहे याचा अर्थ केंद्राला सहकाराला काही मदत करायची इच्छा असेल, तर ते करू शकतात. शरद पवार म्हणाले ते बरोबर आहे की सहकार हा राज्याचा विषय आहे. पण अमित शहांकडे नव्या खात्याची जबाबदारी गेल्याने घाबरण्याचं कारण नाही. त्यातून काही चांगलं घडू शकतं. अमित शहांना सहकाराचा अनुभव असल्याने त्यांच्या मनात काही चांगल्या गोष्टी असतील तर त्या अंमलात आणल्या जातील. त्यातूनही जर काही गैर झालं, तर आम्ही त्याचा सामना करू", अशी अत्यंत सावध प्रतिक्रिया शिवसेनेच्या संजय राऊतांनी दिली.

अमित शाहांच्या सहकार खात्यावर संजय राऊतांची सावध प्रतिक्रिया
"सोनिया सेनेचे प्रवक्ते संजय राऊतजी..."; चित्रा वाघ यांची टीका

शरद पवार काय म्हणाले?

Sharad Pawar
Sharad Pawar

"महाराष्ट्राच्या विधानसभेने सहकारी कायदे केलेले असल्याने त्या कायद्यात केंद्राला हस्तक्षेप करता येत नाही. केंद्र सरकार महाराष्ट्रातील सहकार चळवळीवर काही गडांतर आणेल अशा ज्या काही बातम्या येत आहेत.. त्या बातम्यांना माझ्या मते तरी काहीच अर्थ नाही. केंद्रात १० वर्षे सहकार खाते माझ्याकडे होते. त्यामुळे केंद्र सरकारने नव्याने सहकाराबाबत जो निर्णय घेतला आहे, त्यात काही नविन आहे असं वाटत नाही. दुर्दैवाने माध्यमांनी महाराष्ट्रातील सहकारावर गंडांतर येईल, बंधने आणली जातील असं काहीतरी पसरवलं आहे. ते योग्य नाही", असं रोखठोक मत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.