मुंबई : काल संध्याकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात मुंबईतील ठाकरे स्मारकात एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. संध्याकाळी पाच ते सहा च्या दरम्यान ही महत्त्वाची बैठक पार पडली. यामध्ये नुकत्याच मुंबईबाबत घेण्यात आलेल्या निर्णयांवर दोन्ही काँग्रेसमध्ये नाराजी असल्याची बाब शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना बोलून दाखवल्याची माहिती आहे.
प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबतच मुख्यमंत्र्यांनी लोकप्रतिनिधींना देखील विश्वासात घेऊन काम करावं अशी दोन्ही काँग्रेसची भूमिका आहे. यामध्ये मुंबईच्या मेट्रो पॉलिटन रिजनमध्ये जारी करण्यात आलेला कडकडीत लॉकडाऊन शिथिल करणे, सोबतच मुंबई पोलिसांनी काढलेला २ किलोमीटर परिघातच प्रवास करण्याचा निर्णय यावर चर्चा करण्यात आली होती. सरकारने घेतलेल्या निर्णयांचा नागरिकांकडून तीव्र विरोध होतोय आणि याचा मोठा आर्थिक फटका देखील अनेकांना सहन करावा लागतोय असं लोकप्रतिनिधींचं म्हणणं आहे. हे म्हणणं शरद पवारांमार्फत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यात आलं.
दरम्यान काल झालेल्या बैठकीनंतर आता मुंबईकरांना घरापासून दोन किलोमीटर पर्यंतच प्रवास मुभा देण्याचा निर्णय मुंबई पोलिसांनी मागे घेतलाय. मात्र घराजवळच अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करावी असं आवाहन पोलिसांकवून करण्यात येतंय. सोबतच कोणालाही विनाकारण पकडू नये यावर देखील शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. यानंतर हा नियम देखील आता बदलण्यात आला असल्याचं समजतंय.
मुंबईत मिशन बिगिन अंतर्गत लॉकडाऊन शिथिल करण्यात आलाय. मात्र लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर मुंबई आणि MMR भागात मोठ्या प्रमाणात कॉरोन रुग्ण आढळून आले होते. या प्राश्वभूमीवर सरकारने MMR भागात कडकडीत लॉकडाऊन ला परवानगी आणि मुंबईत केवळ २ किलोमीटर परिघात प्रवासाची मुभा हे निर्णय घेतले होते.
after sharad pawar and uddhav thackeray meet mumbi police rolls back decision of 2 km travel permission
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.