मुंबई : यावर्षी अतिवृष्टीमुळे अन्नधान्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे भाजीपाल्यानंतर आता कडधान्यांच्या भाव कडाडले आहेत. दिवाळीनंतर बाजारात नवीन अन्नधान्याची आवक सुरू होते. मात्र, लॉकडाऊन मंदावलेली वाहतूक या सर्वाचा फटका कडधान्याच्या पुरवठ्यावर झाला. त्यामुळे महिनाभरात कडधान्याचे दर दुपट्ट झाले आहेत.सध्या कडधान्य घाऊक बाजारात शंभर रुपये किलोच्या घरात पोहचले आहेत.या दरवाढीचा फटका सामान्य कुटुंबाच्या जेवणाच्या थाळीवर झाला असून, एकीकडे भाजीपाला तर दूसरिकडे कडधान्याचे दर वाढल्याने ताटात वाढायचे तरी काय असा प्रश्न गृहीणीपुढे निर्माण झाला आहे.
परतीच्या पावसाचा फटका अनेक पिकांना बसला असून राज्यातील अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली आहेत. याचाच फटका कडधान्यांच्या दरावर झाला आहे. दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असताना भाज्यांसह कडधान्यांच्या दरांमध्येही वाढ झाली आहे. ही वाढ गेल्या काही वर्षापासून कायम असून ऑक्टोबर महिन्यातही विविध प्रकारच्या कडधान्यांच्या दरामध्ये पाच ते दहा टक्क्यांनी अधिक वाढ झाल्याचे, घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांनी सांगितले.
यापूर्वी घाऊक बाजारामध्ये असलेले दर आणि किरकोळ बाजारामध्ये असलेल्या किंमतीमध्ये तफावत होती, मात्र आता घाऊक बाजारातही कडधान्याचे दर वाढल्याने कडधान्य सर्वसामान्य ग्राहकांना अवाक्यात राहीले नाही. मटकी, हरभरा डाळ, तूरडाळ, मूग, चणा डाळ, काबुली चणे, हिरवा पांढरा वाटाणा यांचे दरही वाढले आहेत. तर, प्रत्येक दुकानातील कडधान्यांचे दर हे वेगवेगळे असल्याकारणाने ग्राहकांमध्ये ही नाराजी आहे.
सांताक्रूझ भागातील वाकोला येथे राहणाऱ्या रश्मी धुरी या गृहिणी महिन्याला एकदा किराणा भरतात. यामध्ये अनेक कडधान्ये आणि डाळींचा समावेश असतो. शिवाय, आठवड्यातून किमान तीनदा घरात मांसाहार असल्या कारणाने त्यांच्याकडे कडधान्य आणि डाळींचा वापर मोजकाच होतो. त्यामुळे, दर महिन्याला किमान प्रत्येक प्रकारातील 1 ते दिड किलो कडधान्ये आणतात. पालेभाज्यांचे दर वाढल्यामुळे घरातील मेन्युत कडधान्याचा वापर वाढला होता. मात्र आता कडधान्येही अवाक्यात नसल्यामुळे महिन्याच्या एकंदरीत बजेटवर परिणाम झाला आहे. जीम ट्रेनर असलेली दोन्ही मुले घरी आहेत, फक्त वडीलांचं काम सुरू आहे. त्यामुळे महागाई न परवडणारी आहे. कडधान्यांच्या वाढलेल्या किमंतीमुळे महिन्याकाठी आता 500 ते हजार रुपये जास्तीचे मोजावे लागतात.अस त्या सांगतात.
प्रत्येक कडधान्य किलोमागे किमान 30 ते 80 रुपयांनी वाढले
मूग, मटकी, काळे वाटाणे, काबुली चणे यांच्या दरात मागील दोन महिन्यांत प्रतिकिलो 40 ते 60 रुपयांनी वाढ झाली असल्याचे गृहिणी वस्तला आगरे यांनी सांगितलं आहे. गेल्या दोन महिन्यांपासून प्रत्येक भाजीपाल्यात, कडधान्यात आणि डाळींमध्ये वाढ झाली आहे. किमान 25 ते 40 रुपयांची वाढ आहेच
हिरवे वाटाण्यांचा दर सहा महिन्यांपासून वाढले
हिरव्या वाटाण्यांचा दर वाढून सहा महिने झाले आहेत. दर वाढीबाबत काहीही निश्चिती नसते. मार्केटच्या मागणीनुसार दर बदलतात. आता हे दर 1 महिना किंवा जास्तीत जास्त 15 दिवसांनी बदलतील. तूर डाळ आणि चणा डाळीचा दर सध्या वाढला आहे. गेल्या महिन्यात तूर आणि डाळ 20 ते 30 रुपयांनी कमी होती. मात्र, त्याच्यात ही 2 ते 3 क्वॉलिटी असतात. प्रत्येक क्वॉलिटीमध्ये 20 ते 30 रुपयांचा फरक असतो. मनोज चौधरी, किरकोळ विक्रेता, किराणा दुकान , साकीनाका यांनी याबाबत माहिती दिली.
महत्त्वाची बातमी : देशद्रोह आरोप प्रकरणी मुंबई पोलिसांकडून कंगनाला समन्स; सोमवारी चौकशीस हजर राहण्याच्या सूचना
महिन्याभरात दुपट्ट भाव
तूरडाळ
महिन्यापुर्वी- प्रति किलो 100 ते 120 रुपये
आता- प्रति किलो 210
चणाडाळ
महिन्यापुर्वी - प्रति किलो 60 रुपये
आता- 144 रुपये प्रति किलो
मुंगडाळ
महिन्यापुर्वी - प्रति किलो 100 रुपये
आता- 200 रुपये प्रति किलो
बारीक मुगडाळ
महिन्यापुर्वी - प्रति किलो 89 रुपये
आता- 156 रुपये प्रति किलो
सफेद वाटाणा
महिन्यापुर्वी - प्रति किलो 100 रुपये
आता- 140 रुपये प्रति किलो
लाल डाळ
महिन्यापुर्वी - प्रति किलो 70 रुपये
आता- 120 रुपये प्रति किलो
हिरवा वाटाणा
महिन्यापुर्वी - प्रति किलो 100 रुपये
आता- 180 रुपये प्रति किलो
हिरवे मुग
महिन्यापुर्वी - प्रति किलो 100 रुपये
आता- 130 रुपये प्रति किलो
लाल मुग
महिन्यापुर्वी - प्रति किलो 100 रुपये
आता- 180 रुपये प्रति किलो
काळे वाटणे
महिन्यापुर्वी - प्रति किलो 100 रुपये
आता- 144 रुपये प्रति किलो
पावटा
महिन्यापुर्वी - प्रति किलो 100 रुपये
आता- 100 रुपये प्रति किलो
हिरवे चणे
महिन्यापुर्वी - प्रति किलो 100 रुपये
आता- 140 रुपये प्रति किलो
लाल चणे
महिन्यापुर्वी - प्रति किलो 80 रुपये
आता- 110 रुपये प्रति किलो
शेंगदाणा
महिन्यापुर्वी - प्रति किलो 80 रुपये
आता- 117 रुपये प्रति किलो
महत्त्वाची बातमी : नाथाभाऊंच्या सोडचिठ्ठीनंतर मुंबई भाजपचा बडा नेता पक्ष सोडणार ?
कोरोना होऊनये म्हणून डॉक्टर आपली प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्याकरिता मोड आलेली कडधान्य, ताजे अन्न आणि पालेभाज्या खा असे सांगतात. परंतु भाज्या आणि कडधान्यांचा भाव वाढत असल्याने खाणार काय ! मग प्रतिकारशक्ती कशी वाढणार! शेवटी रोग लागून मरण हे येणार हे सत्य आहे असं सुनीता नाकती गृहिणी म्हणतायत.
शाळेतून शुल्क मागत आहेत. हाताला काम नाही. त्यात कांदा महाग, कडधान्य महाग जगणं मुश्किल होऊन बसलं आहे. संसाराचा गाढा चालवताना जगावं की मरावं असा प्रश्न गृहिणी भारती आढाव म्हणालात.
मागणी जास्त पुरवठा कमी -
यावर्षी जास्त पावसामुळे कडधान्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. आवकही बंद असल्याने भाव वाढला. मागणी आणि पुरवठ्यावर मार्केटचा भाव असतो. शिवाय, मागणी जास्त असल्याकारणाने पुरवठा कमी आहे. यावेळेस निर्यातही कुठे केलेले नाही. आता शासनाने पुन्हा आयात करण्याची सूट दिली आहे. आता पुन्हा माल आला की दर कमी होतील. पुढचा एक महिना हे दर असेच राहतील. ऑगस्ट महिन्यापासून हे दर वाढले आहेत. असं ग्रेन, राईस अँड ऑईल सीड्स मर्चंट असोसिएशन अध्यक्ष शरद मारु म्हणालेत.
after vegetables rates of pulses and sprouts increased daly budget of homemakers disturbed
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.