मुंबई - देशात सर्वात जास्त कोरोना पॉझिटिव्ह महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मुंबईत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या लढतीत मुंबई धीराने आणि धाडसाने दोन हात करतेय. मुंबई धीराने आणि धाडसाने कोरोनाशी दोन हात करताना मुंबईकरांची चिंता पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळतेय. याला कारण म्हणजे वरळीनंतर आता इतर मुंबईत फैलावणारा कोरोना.
मुंबईतील वरळीत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. यानंतर आता मुंबईतील धारावीत दादरमध्ये आणि माहीममध्ये कोरोनाचे रुग्ण वाढताना पाहायला मिळतायत. आज धारावीत ५ दादरमध्ये २ आणि माहीममध्ये १ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. याचसोबत मुंबईतील भाटिया रुग्णालयात आणखी १० कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेत. त्यामुळे मुंबईत १५ एप्रिल सकाळ पर्यंत १८ कोरोना रुग्णांची नोंद झालीये.
माहीम आणि दादरमध्ये वाढते कोरोना रुग्ण
वरळीनंतर दादर आणि माहीममध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग पाहायला मिळतोय. दादर आणि माहीमध्ये कोरोना रुग्ण वाढल्याने आता दादरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २१ वर गेली आहे तर माहीम मध्ये कोरोना रुग्णांची संख्या ७ वर गेली आहे.
धारावीत वाढतेय रुग्णांची संख्या
वरळी मागोमाग धारावीत देखील रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळतेय. आज सकाळपर्यंत धारावीत आणखी दोन पुरुष आणि तीन महिलांना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालंय. आज धारावीत वाढलेल्या ५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमुळे धारावीतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६० वर गेली आहे. धारावीत आतापर्यंत ७ लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावलाय.
after worli and dharavi these parts of mumbai are becoming corona hotspot
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.