''हे'' मराठी साहित्यिक नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात

''हे'' मराठी साहित्यिक नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात
Updated on

मुंबई : देशातील नागरिकांचे मूलभूत प्रश्‍न सोडवण्याला प्राधान्य देण्याऐवजी नागरिकत्व ठरवणे हाच देशातला मुख्य प्रश्‍न मानणे, त्यासाठी प्रशासकीय मार्गाचा अवलंब करण्याऐवजी घटनात्मक दुरुस्ती करण्याला प्राधान्य देणे अतिशय अयोग्य आहे. सरकारच्या या संकुचिक वृत्तीचा आणि दडपशाहीचा मराठी साहित्यिकांनी निषेध करत नागरिकत्व दुरुस्ती अधिनियम 2019 सरकारने मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे. 

नागरिकत्व दुरुस्ती अधिनियमाद्वारे भारतीयत्वाचा अनादर करणाऱ्या सरकारचा निषेध असे निवेदन मराठी साहित्यिकांनी काढले आहे. यामध्ये सतीश आळेकर, नीरजा, जयंत पवार, अवधूत डोंगरे, रवींद्र लाखे, राजीव नाईक, प्रफुल्ल शिलेदार, राजन खान, शांता गोखले, बालाजी सुतार, मनस्विनी लता रवींद्र, सुबोध जावडेकर, राजन गवस अशा एकूण 34 मराठी साहित्यिकांनी या अधिनियमाचा निषेध केला आहे. 

या अधिनियमामुळे देशातील विशिष्ट समाजघटकांना अस्थिर करण्याचा व स्वतःचा मतदार वर्ग दृढ करण्याचा प्रयत्न स्पष्टपणे दिसतो. शिवाय, देशातील मूलभूत प्रश्‍नांमधून लक्ष विचलित करण्यासाठी सतत युद्धग्रस्त स्थिती असल्यासारखी विधाने करणे किंवा मतभिन्नता दर्शवणाऱ्यांना पाकिस्तानी देशद्रोही संबोधणे आणि आता तर विशिष्ट घटकांमधील नागरिकांना स्वतःच्या नागरिकत्त्वाविषयी अस्थिरता वाटायला लावणे ही विषण्णकारी परिस्थिती आहे. या सर्व परिस्थितीच्या विरोधात देशात ठिकठिकाणी असंतोष उफाळला असताना सरकार त्याची गांभीर्याने दखल घेत नसून या उलट विरोध ठेचून काढण्यासाठी हिंसक मार्ग वापरत आहे.

हे दिल्लीच्या जामिया मिलिया विद्यापीठात घुसून पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या अमानुष लाठीमारातून दिसून आले. सरकारच्या या दडपशाहीचा मराठी साहित्यिकांनी तीव्र निषेध केला आहे, असे निवेदनात म्हटले आहे. 
भाजपची वृत्ती भारतीयत्वाला काळिमा फासणारी स्थलांतराचा गंभीर प्रश्‍न स्वतःच्या देशातंर्गत राजकीय प्रकल्पासाठी वापरणे, त्यासाठी राज्यघटनेतील नागरिकत्त्वाविषयीच्या तरतुदीत मूलभूत बदल करणे, त्यातून समाजघटकांना वगळणे निषेधार्ह आहे. भाजप सरकार हेच करू पाहत आहे. शेजारी राष्ट्रांच्या संदर्भात स्वतःचं राष्ट्रीयत्व ठरवणारी भाजपची वृत्ती एकंदरच भारतीयत्त्वाला काळिमा फासणारी आहे, इथल्या बहुविधतेची जाण ठेवण्याऐवजी या बहुविधतेचा अनादर करणारी ही वृत्ती आहे, त्याचा मराठी साहित्यिकांनी निषेध केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.