Ulhasnagar News : मृत्यूपूर्वी 7 व्या वेतनाची एकत्रित रक्कम मिळण्यासाठी सेवानिवृतांचे आंदोलन; 2 हजार रुपयांची भीक नकोचे पालिकेला दिले पत्र

सेवानिवृत्त कर्मचारी दुर्धर आजारांनी ग्रस्त असून असंख्य घरगुती अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Agitation
Agitationesakal
Updated on

उल्हासनगर - सेवानिवृत्त कर्मचारी दुर्धर आजारांनी ग्रस्त असून असंख्य घरगुती अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशाप्रसंगी मृत्यूपूर्वी ग्रॅच्युइटी, रजा रोखिकरन आणि 7 व्या वेतन आयोगाच्या फरकाची एकत्रित रकम आमच्या पदरात पडणार काय? अशी हाक शेकडो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी उल्हासनगर महानगरपालिकेला दिली होती.

मात्र पालिकेने या हाकेला प्रतिसाद दिला नसल्याने संतप्त झालेल्या सेवनिवृत्तांनी गुरुवारी 19 तारखेला कायद्याने वागा लोकचळवळ आणि लेबर राईट्स यांच्या बॅनरखाली आंदोलन पुकारले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.