मुंबई - बीडच्या परळीत नाथ प्रतिष्ठानच्या वतीने गणपती महोत्सवाचे आयोजन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला रश्मिका मंदाना आणि क्रिती सेनन यांनी उपस्थिती लावली होती. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील हजारो शेतकऱ्यांच्या कुटुंबात ऐन सणासुदीच्या काळात नैराश्य आहे. अशा स्थितीत कृषिमंत्री या महागड्या सिनेतारकांवर कोट्यवधी रुपये उधळत आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.