उष्णतेच्या लाटेमुळे एसी आणि कूलरला अच्छे दिन; ग्राहकांच्या खिशाला कात्री

AC
ACsakal media
Updated on

ठाणे : नोव्हेंबर ते जानेवारीदरम्यान ठाण्यासह आसपासच्या शहरांमध्ये थंडीची लाट येऊन तापमानाच्या पाऱ्याने अनेक वर्षांचा निचांक गाठला. त्यामुळे घरातील एसी (Air conditioner) आणि कूलरच (cooler) काय तर फॅनची घरघरही काही काळ शांत झाली होती; मात्र आता मार्च महिना उजाडल्यापासून शहरी भागात उष्णतेची लाट (summer hit) आल्यामुळे एसी आणि कूलर विक्रीला ‘अच्छे दिन’ येऊ लागले आहेत. उष्णतेपासून बचावासाठी ग्राहक कार्यालय तसेच घराकरिता एसी आणि कूलरच्या खरेदीकडे वळले असले, तरी पाच ते १० दिवसांपासून इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या (electronic gadgets price increases) वाढलेल्या किमतींमुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री बसत आहे.

AC
पनवेल : २३ लाख ७९ हजाराची वीज चोरी; आरोपीविरोधात गुन्हा दाखल

हवामान खात्याच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात उष्णतेची लाट आल्यामुळे ठाणे शहरातील कमाल तापमान मागील काही दिवसांपासून ४० ते ४२ अंश सेल्सियस इतके नोंदवले जात आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत असून शरीराला थंडावा मिळावा यासाठी नागरिक हरतऱ्हेचे प्रयत्न करत आहेत. या तापमानवाढीत घरात थंडावा राहावा यासाठी फॅनही फारसा दिलासा देत नसल्याने सध्या नागरिकांची पावले एसी आणि कूलर खरेदीसाठी इलेक्ट्रॉनिक दुकानांकडे वळत आहेत. दरवर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळा हा अधिकच तापदायक ठरत असल्याने मार्च महिन्यापासूनच एसी आणि कूलरच्या खरेदीला ग्राहकांची मोठी मागणी असल्याचे ठाणे शहरातील विक्रेत्यांनी सांगितले.

कूलरच्या तुलनेत एसीला मागणी

१) कूलरच्या तुलनेत एसी वातावरणात अधिक थंडावा निर्माण करत असल्याने ग्राहक एसी खरेदीला प्राधान्य देताना दिसत आहेत. सध्या ठाणे शहरातील दुकानांमध्ये विजेची बचत करणाऱ्या इन्व्हर्टर एसींना अधिक मागणी असून, एक टन, दीड टन, दोन टन या एसींची ग्राहक अधिक खरेदी करीत आहेत. विविध कंपनी तसेच एसीच्या प्रतिटनानुसार किमती २८ हजार ते ४० हजारापर्यंत आहेत.

AC
मुंबईतील पाणीप्रदूषणाकडे कानाडोळा; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

२) महागाईमुळे उत्पादन खर्चातही वाढ झाल्यामुळे मागील पाच ते १० दिवसांमध्ये एसीच्या किमतींमध्ये दोन ते तीन हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी २६ ते २७ हजारापर्यंत मिळणाऱ्या एक टनाच्या एसीची किंमत आता ३० हजारांपर्यंत पोहोचली आहे. एप्रिल मे महिन्यात एसी कंपन्यांकडून नवीन उत्पादने बाजारात आणली जातात. त्यामुळे पुढील काही दिवसांत एसीच्या किमती एक ते दीड हजार रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.

कूलरचा थंडावाही वाढला

उन्हाला कंटाळून ग्राहक एसी आणि कूलरमध्ये अधिकतर एसीची निवड करत असले, तरी महागाईच्या काळात एसी खरेदी न परवडणारे ग्राहक कूलरच्या खरेदीकडे वळत आहेत. सध्या ठाणे शहरात पर्सनल कूलर, टॉवर कुलर, डेजर्ट कूलर अशा विविध प्रकारच्या कूलरना ग्राहकांची मागणी आहे. त्यांच्या किमती पाच ते १० हजारांपर्यंत आहेत. एसीच्या तुलनेत कूलरच्या किमतींमध्ये अधिक वाढ झाली नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

ईएमआयद्वारे खरेदी अधिक

युक्रेन-रशियाच्या युद्धामुळे भारतात महागाई नवीन उच्चांक गाठत आहे. दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांना याची झळ बसली आहे. उन्हाळ्यात एसीची खरेदी करीत असताना एकरकमी पैसे देण्यापेक्षा ग्राहक ईएमआयचा पर्याय निवडत आहेत. ठाणे शहरात इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठी ग्राहकांना ईएमआयचा पर्याय सहज उपलब्ध असून काही ठिकाणी शून्य डाऊनपेमेंट, एसीच्या सर्व्हिसिंगवरही विशेष सूट दिली जात आहे.

मार्च महिन्यात उष्णेतची लाट आल्यापासून एसी आणि कूलरच्या विक्रीमध्ये वाढ झाली आहे. सध्या दररोज १० ते १५ ग्राहक एसी तसेच कूलरच्या खरेदीसाठी येत आहेत. कूलरच्या तुलनेत एसी खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. एसीच्या किमती वाढल्या असल्या तरी उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळावा तसेच ईएमआयचा पर्याय उपलब्ध असल्याने ग्राहक त्यांची खरेदी करीत आहेत.

- अमित खांडेकर, एसी आणि कूलर विक्रेते, ठाणे

यंदा उन्हाळा खूपच वाढल्याने एसी खरेदीसाठी आलो आहोत. एसीमुळे काहीसा थंडावा मिळणार असला तरी महागाईच्या काळात एसीच्या वाढलेल्या किमतीमुळे खिशाला चटका बसणार आहे; मात्र उन्हापासून बचावासाठी दुसरा उत्तम पर्याय नसल्याने एसीची खरेदी करीत आहोत.

- संतोष पालांडे, ग्राहक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.