Air India Ticket Refund: पावसामुळे रद्द झालेल्या विमानाच्या तिकिटाचे पैसे परत मिळणार का? एअर इंडिया म्हणतेय...

Mumbai Rain: मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसामुळे उड्डाण संचालनावर परिणाम झाला आहे, परिणामी काही उड्डाणे रद्द आणि वळवण्यात आली आहेत.
Air India Ticket Refund for cancelled flights due to Rain
Air India Ticket Refund for cancelled flights due to RainEsakal
Updated on

रविवारी रात्री 8 वाजेपर्यंतच्या 12 तासांत मुंबई आणि उपनगर भागात 100 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक भागात रस्ते पाण्याखाली गेले, उड्डाणे वळवावी लागली आणि दादर ते माटुंगा स्थानकांदरम्यान मध्य रेल्वेच्या सेक्शनवर पाणी साचल्याने लोकल ट्रेनची वाहतूक प्रभावित झाली.

मुंबई शहरात रविवारी सकाळी 8 ते रात्री 8 दरम्यान 101 मिमी पावसाची नोंद झाली, तर पूर्व आणि पश्चिम उपनगरात अनुक्रमे 121 मिमी आणि 113 मिमी पाऊस पडला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान मुंबई विमानतळावरील एकूण 36 उड्डाणे रद्द करण्यात आली तर 15 उड्डाणे शहरातील अधूनमधून मुसळधार पावसामुळे जवळच्या विमानतळांवर वळवण्यात आली.

सूत्रांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे, विमानतळ ऑपरेटरला दिवसातून दोनदा धावपट्टीचे कामकाज स्थगित करावे लागले - एकदा दुपारी 12.12 वाजता आठ मिनिटांसाठी आणि दुसरी वेळ दुपारी 1 ते 1.15 पर्यंत.

मानखुर्द, पनवेल आणि कुर्ला स्थानकांजवळ पाणी साचल्याने हार्बर मार्गावरील लोकल ट्रेन १५ ते २० मिनिटे उशिराने सुरू होत्या, तर पश्चिम रेल्वेवरील सेवा सुरळीत सुरू होत्या.

Air India Ticket Refund for cancelled flights due to Rain
Maharashtra Rain Update : कोकणात कोसळधार; विदर्भाला झोडपले

एअर इंडिया देणार रिफंड

मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसामुळे उड्डाण संचालनावर परिणाम झाला आहे, परिणामी काही उड्डाणे रद्द आणि वळवण्यात आली आहेत.

याचा संदर्भ देत, एअर इंडियाने प्रवासासाठी कन्फर्म झालेल्या बुकिंगसाठी पूर्ण रिफड किंवा एक वेळचे नि:शुल्क रीशेड्युलिंग देण्याचा निर्णय घेतला आहे.

यासाठी एअरलाइनने एक्सवर एक लिंक देखील शेअर केली आणि लोकांना विमानतळावर जाण्यापूर्वी फ्लाइटची स्थिती तपासण्यास सांगितले.

Air India Ticket Refund for cancelled flights due to Rain
Devendra Fadnavis : ...म्हणून अजित पवार महायुतीत;देवेंद्र फडणवीस,कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

पोलिसांकडून ॲडव्हायझरी

दरम्यान, मुंबई पोलिसांनी एक ॲडव्हायझरी जारी केली असून, शहरातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना किनारपट्टीच्या भागात जाणे टाळण्यास सांगितले आहे.

पोलिसांनी आपल्या ॲडव्हायझरीमध्ये म्हटले आहे की, रहिवाशांनी आवश्यक असल्यासच त्यांचे घर सोडावे आणि खबरदारी घ्यावी. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत 100 क्रमांकावर फोन करण्याचे आवाहन देखील केले आहे.

तत्पूर्वी, मुंबई नागरी प्राधिकरणाने रहिवाशांना अत्यावश्यकतेशिवाय बाहेर जाण्याचे टाळण्याचे आवाहन केले, कारण भारतीय हवामान विभागाने (IMD) शहरासाठी ऑरेंज अलर्ट जारी करत जोरदार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.