उल्हासनगरातील हवा नागरिकांच्या आरोग्यास हानीकारक; 'या' NGO ची माहिती

Mumbai Vatavaran NGO
Mumbai Vatavaran NGOsakal media
Updated on

उल्हासनगर : अवघ्या 13 किलोमीटर क्षेत्रफळाच्या क्षेत्रात आणि दाटीकुटीने वसलेल्या उल्हासनगर (Ulhasnagar) शहरातील हवा ही प्रदूषित (Air pollution) झालेली असून नागरिकांच्या आरोग्यासाठी हानिकारक असल्याची बाब मुंबईतील वातावरण सामाजिक संस्थेने (Mumbai vatavaran NGO) समोर आणली आहे. ह्या संस्थेने मागील दोन महिन्यांपासून हवेचे परिक्षण केले असून त्याचा अहवाल लवकरच शहरवासीयांसमोर सादर करण्यात येणार आहे.

Mumbai Vatavaran NGO
मुंबई होणार क्रूझ कॅपिटल; २०४० मध्ये ३० लाख प्रवासी येणार ?

उल्हासनगर शहर हे लोकसंख्येच्या बाबतीत दाट घनतेचे शहर आहे. औद्योगिक शहर असल्यामुळे विस्थापित कामगारांची संख्या मोठी आहे. मात्र त्या प्रमाणात शहरात वृक्षांची संख्या ही देखील कमी आहे. त्यामुळे शहरातील हवा ही दिवसेंदिवस प्रदूषीत होत आहे. भारतातील दूषीत शहरांच्या यादीत उल्हासनगरचा देखील समावेश आहे. त्याची पडताळणी करण्यासाठी मुंबईस्थीत वातावरण ह्या सामाजिक संस्थेने नोव्हेंबर महिन्यात कॅम्प 1 मधील उल्हासनगर पोलीस स्टेशन,कॅम्प 3 मधील नवजीवन बँक,कॅम्प 4 मधील व्हीनस चौक आणि कॅम्प 5 मधील सर्वानंद हॉस्पिटल जवळ अशा चार ठिकाणी हवेतील घटक मापणारी डिजिटल यंत्रणा बसवली होती.

काल बुधवारी वातावरण सामाजिक संस्थेच्या संचालिका फराह काझी यांनी या बसवलेल्या यंत्रणेची पाहणी केली असता, शहरातील हवेचे वातावरण प्रदूषित असल्याचे समोर आले आहे.या माहितीचा अहवाल पुढील आठवड्यात शहरासमोर ठेवणार असल्याची माहिती वातावरण मित्र बाबुराव खेडेकर,विनोद सेवलानी यांनी दिली. यावेळी ध्वनी प्रदूषणावर काम करणाऱ्या सरिता खानचंदानी,मुकेश लुटवानी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.