मुंबई: विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसामुळे (Heavy rain) मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गवरील (Trans harbour route) रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. ऐरोली स्टेशनजवळील ओव्हर हेड वायरमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे संध्याकाळी ६.२० पासून अप मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली होती. ही कामावरुन घरी परतण्याची वेळ होती. त्यामुळे नोकरदारांना त्रास सहन करावा लागला.
आता हार्बर मार्ग पुन्हा एकदा सुरळीत सुरू झाला आहे. ऐरोली स्थानकाजवळ ओव्हर हेड वायर मध्ये तांत्रिक बिघाड होऊन विद्युत प्रवाह खंडित झाला होता. त्यामुळे पनवेलहून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गावरील रेल्वे वाहतूक तब्बल २ तास ठप्प होती . दुरुस्तीचं काम आता संपलं असून हा मार्ग पुन्हा सुरू झाला आहे.
पनवेलवरून ठाण्याच्या दिशेला जाणाऱ्या मार्गावर संध्याकाळी ०६:२० वाजता तांत्रिक बिघाड झाला होता. मुंबईत लोकल सेवेला जीवनाहिनी म्हटलं जाते. दररोज लाखो लोक ट्रेनमधून प्रवास करतात. पण कधी सिग्नल यंत्रणेत तर कधी ओव्हर हेड वायरमधल्या बिघाडामुळे लोकल सेवा विस्कळीत होत असते. कोरोना आणि लॉकडाउनमध्ये मागच्या दीडवर्षात लोकल प्रवास करणाऱ्याची संख्या कमी होती. पण आता कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्यांसाठी लोकल प्रवास सुरु केला आहे. लोकलमध्ये बऱ्यापैकी गर्दी असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.