अजित पवार 'इन' अन् गोपीचंद पडळकर 'आऊट'; फडणवीसांच्या सागर बंगल्यावर नेमकं काय घडलं?

ajit pawar gopichand padalkar
ajit pawar gopichand padalkar
Updated on

मुंबई- गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर गेले होते. योगायोगाने याच वेळी सागर बंगल्यावर भाजपचे नेते गोपीचंद पडळकार हेही उपस्थित होते. अजित पवार आणि गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. अजित पवार सागर बंगल्यावर येताच गोपीचंद पडळकर बाहेर पडल्याचं पाहायला मिळालं.(ajit pawar and gopichand padalkar in sagar building of deputy cm devendra fadanvis)

'साम'ने दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार गणपतीच्या दर्शनासाठी देवेंद्र फडणवीसांच्या सरकारी बंगल्यावर पोहोचले होते. याचवेळी तेथे गोपचंद पडळकर उपस्थित होते. अजित पवार आल्याचं कळताच गोपचंद पडळकर यांनी बंगल्याच्या बाहेर पडण्याचं ठरवलं. अजित पवार एका गेटने आत गेल्यानंतर पडळकर दुसऱ्या गेटमधून बाहेर पडल्याचं पाहायला मिळालं.

ajit pawar gopichand padalkar
Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

अजित पवार आणि गोपीचंद पडळकर यांच्यामधील वाद टोकाला गेलेला आहे. काही दिवसांपूर्वी गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्यावर बोलताना अत्यंत खालच्या पातळीची भाषा वापरली होती. त्यानंतर दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांनी एकमेकांसमोर येण्याचे टाळल्याचं बोललं जातंय.

अजित पवार लबाड लांडक्याचे लबाड पिल्लू आहेत. त्यांना आम्ही महत्व देत नाही, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली होती. त्यानंतर अजित पवार गट आक्रमक झाला होता. अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी पडळकरांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर घणाघात केला होता. देवेंद्र फडणवीसांनी गोप्याला आवरावे अन्यथा आम्हाला आवरणे कठीण होईल, असा धमकी वजा इशारा त्यांनी दिला होता. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.