राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत होती. हेच लक्षात घेऊन राज्य सरकारने निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र आता गेल्या साधारण आठवड्याभरापासून रुग्णसंख्या पुन्हा वेगाने वाढत आहे. त्यामुळे राज्याची चिंता वाढली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. तसंच राज्यातली परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीतीही व्यक्त केली आहे. (Ajit Pawar News)
मुंबईत माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, "राज्यातल्या कोरोनाच्या केसेस सातत्याने वाढतायत. त्यामुळे सध्या काळजीचं वातावरण आहे. आम्ही सगळ्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. पण एकदा का कोरोना रुग्णांची संख्या वाढली की ती कशी पटकन हाताबाहेर जाते, हे आपण पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या लाटेदरम्यान बघितलं आहे. त्यामुळे सर्वांनीच काळजी घेण्याची गरज आहे.
पेट्रोल डिझेल दरात अजून कपात होणार का?
याबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले, "आम्ही इंधन दरामध्ये शक्य तेवढी कपात केलेली आहे. पण अजून २०१९ पासून जीएसटी परताव्याची रक्कम येणं बाकी आहे. तरी केंद्र सरकारने इंधन दरात कपात केल्यानंतर आम्हीही दरकपात केली. साडेतीन हजार कोटी रुपये जे राज्याच्या तिजोरीत येणार होते, त्याचा वापर लोकांच्या फायद्यासाठी केला आहे. त्यापेक्षा मोठा निर्णय़ सीएनजी, गॅसच्या दर कपातीबद्दल घेतलाय."
अहमदनगरचं अहिल्यानगर करा; पडळकरांच्या मागणीवर अजित पवार म्हणतात...
हे आज सुरू आहे का? अनेक वर्ष अशा मागण्या येतायत. औरंगाबाद, उस्मानाबादबद्दलही अशी मागणी आहे. प्रत्येकाला अशा प्रकारच्या मागण्या करण्याचा लोकशाहीत अधिकार आहे . ज्यांचं नाव द्यायची मागणी होतेय, त्या सगळ्या वंदनीय आदरणीय व्यक्ती आहेत. पण तरी आपल्यासमोर कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत, तिकडेही महत्त्व द्यायला पाहिजे. अर्थात या मागण्या आणि त्यांचे प्रश्नही महत्त्वाचे आहेतच.
अजित पवार पुढे म्हणाले, "आता परवा काही महंत चर्चेला बसले. एकमेकांवर माईकचा बूम उगारला. त्याचं काल भुजबळांनी प्रात्यक्षिक दाखवलं. या सगळ्यातून आपण काय मिळवणार आहोत याचा विचार सर्वांनी करावा."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.