Anand Paranjpe : ''ते हॉटेल शरद पवार गटाने विकत घेतले होते का? जितेंद्र आव्हाड वैफल्यग्रस्त झालेत''

लोकसभेच्या यशानंतर काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये स्वत:ला मोठा भाऊ समजायला लागली आहे.
Anand Paranjpe vs Jitendra Awhad
Anand Paranjpe vs Jitendra Awhadesakal
Updated on
Summary

लपून छपून नाही तर मीडिया आणि सर्व आमदारांना घेऊन दर्शनाला गेले. काही जण लपून छपून शनी अमावस्येला शनी शिंगणापूरला दर्शन घेतात, असा टोलाही परांजपे यांनी लगावला.

ठाणे : २०० कोटींमध्ये इमेज मेकओव्हर हा आरोप कथा कल्पित आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने २०१९ साली आमदारांना मोठ्या हॉटेल्समध्ये ठेवले होते. त्यावेळी ते हॉटेल राष्ट्रवादी शरद पवार गटाने विकत घेतले होते का? त्यामुळे अशा आरोपांना मी काही फारसे महत्त्व देत नाही. तसेच जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे वैफल्य ग्रस्त झाले असल्याची टीका अजित पवार गटाचे शहराध्यक्ष आनंद परांजपे (Anand Paranjpe) यांनी केली.

ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत परांजपे यांनी ही टीका केली. रोहित पवार (Rohit Pawar) आणि जितेंद्र आव्हाड सातत्याने खोटे आरोप करत असतात. लोकसभेच्या यशानंतर काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये स्वत:ला मोठा भाऊ समजायला लागली आहे. ते विधानसभेला २८८ उमेदवार उभे करायचा विचार करत आहेत. काँग्रेसचा एखादा सच्चा कार्यकर्ता मुंब्रा कळव्यातून तिकीट मागत नाही ना? याकडे आव्हाडांनी लक्ष द्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

Anand Paranjpe vs Jitendra Awhad
'ज्यांनी निवडणुकीत हरवण्याचा प्रयत्न केला, वाट लावण्याचा प्रयत्न केला त्यांना सोडणार नाही'; नीलेश राणेंचा कोणाला इशारा?

काँग्रेसचे ठाण्यातील नेते सातत्याने आव्हाडांनी ठाण्यातील काँग्रेस संपवल्याचे आरोप करीत असतात. निधी मिळत नसल्याच्या आरोपही तथ्य नसल्याचा दावा परांजपे यांनी केला. मी, नजीब मुल्ला आणि स्थानिक नगरसेवकांच्या मागणीनुसार ५० कोटीचा विकास निधी आला आहे. तो खऱ्या विकासासाठी निधी वापरला जाईल. आव्हाड यांच्या माध्यमातून निधी दिला तर एका ठराविक ठेकेदाराला कामे दिली जातात. निधीच्या बाबतीत महायुतीकडून कोणताही भेदभाव नाही. आतापर्यंत १०५ कोटी रुपये मुंब्रा-कळव्यासाठी निधी आल्याची माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, अजित पवार यांनी राज्यातील माता भगिनी, बळी राजा व सर्व घटकांना सुख समृद्धी लाभो, यासाठी सिद्धी विनायकाकडे साकडे घातले. १४ जुलैला बारामतीमध्ये सभा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभेच्या तयारीला लागली आहे. लपून छपून नाही तर मीडिया आणि सर्व आमदारांना घेऊन दर्शनाला गेले. काही जण लपून छपून शनी अमावस्येला शनी शिंगणापूरला दर्शन घेतात, असा टोलाही परांजपे यांनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.