Assembly Elections: विधानसभा निवडणुकीत अजितदादा 'एम' कार्ड खेळणार; चार उमेदवारांची नावेही समोर

Assembly Elections: विधानसभेसाठी अजित पवार गटाने जय्यत तयारी सुरू केली आहे. ते विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मुस्लीम उमेदवारांना देणार असल्याचे आता समोर आले आहे.
Ajit Pawar
Ajit PawarESakal
Updated on

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीत सर्वच राजकीय पक्ष व्यस्त आहेत. प्रत्येकजण जनतेला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही जोरात सुरू असून युतीसाठी चर्चेसाठी बैठका सुरू आहेत. गणेशोत्सवानंतर महायुतीच्या जागावाटपाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. अशातच अजित पवार गटातून मोठी अपडेट समोर आली आहे.

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष मुस्लीम समाजाला सर्वाधिक जागा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. जागा वाटपात मिळणाऱ्या एकूण जागांपैकी १० टक्के जागांवर मुस्लीम उमेदवार देणार असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबईत चार आणि एमएमआर रिजनमध्ये १ अशा ५ जागांवर मुस्लीम उमेदवार देणार आहेत. महायुतीमध्ये मुंबईत राष्ट्रवादीला ४ जागा सुटणार आणि चारही जागांवर मुस्लीम उमेदवार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष देण्याची शक्यता आहे.

Ajit Pawar
मोदींचे १० साल 'बेमिसाल', एकनाथ शिंदेंकडून पंतप्रधानांचे तोंडभरून कौतुक, काय म्हणाले?

प्रत्येक प्रादेशिक विभागात एक मुस्लिम उमेदवार देण्याचा प्रयत्न अजित पवार गटाचा असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. तसेच या संभाव्य उमेदवारांची नावेही समोर आली आहे. नवाब मलिक, सना मलिक, जिशान सिद्दीकी आणि नजीम मुल्ला यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता अजित पवार गटातील इच्छुकांची काय प्रतिक्रिया येणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच यांना उमेदवारी दिल्याने इच्छुक बंड करणार का? यावरही लक्ष असणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.