Shashikant warishe : विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. सभागृहात रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारिशे हत्या प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याप्रकरणी सभागृहात प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. अजित पवार यांनी सभागृहात पंढरीनाथ आंबेरकरच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असलेल्या जाहिरातीच सभागृहात दाखवल्या. त्यामुळे सभागृहातील वातावरण तापले होते.
जाहीराती दाखवताना अजित पवार म्हणाले, "ज्याने नीच कृत्य केलं. त्याने तुमच्या वरीष्ठांसोबत जाहीराती लावल्या आहेत. सरकारने एसआयटी स्थापन केली आहे. त्यावर अजिबात दबाव येऊ देऊ नका. असे फोटो लावल्यामुळे शंका उपस्थित होतो. त्यामुळे तपास पारदर्शकपणे झाला पाहिजे. हे सर्व जाणीवपूर्वक केल्याचं दिसतं."
"आपण पत्रकारांकडे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून बघतो. शशिकांत वारिशेंच्या कुटुबीयांना शासनाकडून काही आर्थिक मदत करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात रिफायनरीचे समर्थक आणि विरोधक असा वाद सुरू आहे, अशी शंका येते. आपण पोलीस खात्याचे प्रमुख म्हणून तुमचं काय म्हणणं आहे आणि रिफायनरी संदर्भात तुमची भूमिका काय आहे?", असा प्रश्न अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना केला.
देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर -
शशिकांत वारिशे यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांनी २५ लाख रुपये मदत दिली आहे. जे आपण म्हणता ती वस्तुस्थिती आहे. माझं आणि मुख्यमंत्र्यांचं बॅनर त्याने लावले होते. याचा कोणताही दबाव पोलिसांवर नाही. तात्काळ या व्यक्तीला अटक केली. त्याच्यावर ३०२ कलम लावण्यात आले आहे. तसेच एसआयटी देखील नेमण्यात आल्याचे फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, या प्रकरणावर वरिष्ठांना लक्ष ठेवायला सांगितलं आहे. या नीच कृत्याप्रकरणी आरोपीवा शिक्षा झाली पाहीजे. तसेच तपास झाला की, हा खटला फास्ट ट्रॅकमध्ये घेण्याची विनंती कोर्टाला करण्यात येणार आहे. आहोत. जेणेकरून तात्काळ निकाल लागावा."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.