उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अजित पवार यांचे समर्थक संजोय वाघिरे यांनी शिवबंधन बांधलं. ठाकरे गटात पक्षप्रवेश केल्यानंतर संजोय वाघिरे यांच्याकडे मावळ लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. आजच्या पक्षप्रवेशानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी यासंबंधीचे सूचक वक्यव्य देखील केलं.
संजय राऊत म्हणाले की, संजोग वाघिरे शिवसेनेत आले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांना शिवबंधनात बांधून परिवारात सामिल करून घेतलं आहे. आम्ही शिवसेनेच्या भावूक असतो पण आता आपल्याला लढायचं आहे. तुमच्याकडे जबाबदारी आहे, ती मावळ शिवसेनेकडे परत खेचून आणण्याची. २०२३ मावळताना हा शिवसेनेचा सूर्य तेजाने उगवताना दिसतोय.
शब्द दिला होता म्हणून...
दरम्यान मुंबईत मातोश्रीवर झालेल्या या पक्ष प्रवेशावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, काही जण भावूक आहेत ते सगळे भगव्यासोबत आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघ निर्माण झाला तेव्हापासून शिवसेना जिंकत आली आहे. अगदी सुरूवातीला बाबर साहेब होते. नंतर मी शब्द दिला म्हणून आता गद्दार झाले त्यांना उमेदवारी दिली. आपल्याकडे उमेदवार नव्हता असं काही नव्हतं पण त्यांनी गद्दारी केली.
कालसुद्धा जळगावमधून बरेच लोक शिवसेनेते आले, आज तुम्ही आलात. सत्ता नसताना सत्ता आणण्याच्या जिद्दीने तुम्ही आलात. सत्ता आहे तिकडे लाचारीने काहीजण गेले आहेत. स्वाभीमानी आणि गद्दार यांच्यात हाच फरक आहे.
मावळ येथे लोकसभा निवडणुकीत मी प्रचाराला नक्की येणार, हा मतदारसंघ भैगोलिकदृष्या वेगळा आहे. पण आज रायगडमध्ये देखील शिवसैनिक माझ्यासोबत उभे आहेत, त्यांनी सांगितलं की तुम्ही द्याल तो उमेदवार. आता तुमची जबाबदारी मोठी आहे. कामाला सुरूवात करा, खासकरून मधल्या काळात होऊ दे चर्चा असा कार्यक्रम सुरु केला होता तो पुन्हा सुरू करा असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
निवडणूक कशी जिंकायची याची मला काळजी नाहीये, कारण तुमचा उत्साह दांडगा आहे. हा दांडगा उत्साह विजय मिळवल्याशिवाय राहणार नाह अशी मला खात्री आहे असेही उद्धव ठाकरे म्हणाले. मावळ म्हणजे पुण्याचा भाग येतो, पुणे म्हटलं की शिवनेरी आलीच. त्यामुले जिथं शिवाजी महाराज जन्माला आले तिथंच गद्दारी गाडण्याची सुरूवात करू असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.