Mumbai News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवडणुकीच्या काळात घशाचा संसर्ग झाला असल्याने डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितले आहे. मात्र ते उद्यापासून प्रचारात सहभागी होणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
काँग्रेसने केलेले आरोप योग्य नसून अजित पवार यांच्यासारखा लोकनेता, पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या नेत्याला प्रचारापासून बाजूला ठेवून कोण स्वतः चे नुकसान करून घेईल,' असा सवाल पाटील यांनी केला.
"पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार आणि रोहित पवार यांनीही भविष्यवाणी केली आहे. त्यांनी राज्याची भविष्यवाणी करू नये," असा टोला त्यांनी लगावला.
बारामती मतदारसंघातील मतदान झाल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार नेमके आहेत कोठे, असा प्रश्न विचारला जात आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यात तसेच महायुतीच्या प्रचारातही त्यांची गैरहजेरी दिसत आहे. यावरून माध्यमांमध्ये चर्चा सुरू आहेत. त्यावर नाशिकमध्ये भाष्य करताना शरद पवार म्हणाले की, बारामतीचे मतदान झाल्यापासून अजित पवार खरंच आजारी आहेत, अशी माझी माहिती आहे. त्यामुळे ते कुठे दिसत नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.