Mumbai: अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेली कागदपत्रे मिळावीत यासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या मध्यस्थी याचिकेची न्या. रेवती मोहिते डेरे यांच्या खंडपीठाने आज दखल घेतली. ऑडिओ, व्हिडिओ रेकॉर्डिंगसह इतर कागदपत्रे याचिकाकर्त्यांकडे सुपूर्द करण्याचे निर्देश खंडपीठाने पोलिसांना दिले.
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा मुंब्रा बायपास रोडवर पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला. अक्षयने एका पोलिस कर्मचाऱ्याची रिव्हॉल्व्हर हिसकावून पोलिसांवर हल्ला केला. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे याच्या डोक्यात गोळी घुसून तो जागीच ठार झाला.