Akshay Shinde Encounter: तपासावर आक्षेप का? अन् कशासाठी?; शिंदे-फडणवीस-निकमांच्या विधानांवरुन अंधारेंनी उपस्थित केले सवाल

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा काल पोलिसांनी एन्काऊंटर केला.
Sushma Andhare
Sushma Andharesakal
Updated on

Akshay Shinde Encounter: बदलापूरमध्ये चिमुकल्या विद्यार्थीनींवर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी काल एन्काऊंटर केला. यानंतर राज्यात मोठा गदारोळ माजला असून विरोधकांनी या कृतीला बेकायदा ठरवत या घटनेमागील मास्टरमाइंडला वाचवण्यासाठी केलेला प्रयत्न असं म्हटलं आहे. दरम्यान, ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत यानिमित्तानं अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. हे करताना त्यांनी मुख्यंमत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना धारेवर धरलं आहे.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

सुषमा अंधारे म्हणाल्या, "काल मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि न्यायाधीश हे सगळे कोर्टाच्या महत्वाच्या वास्तूच्या कार्यक्रमानिमित्त एकत्र येतात आणि त्याचवेळी न्यायव्यवस्थेसोबत अतिशय घृणास्पद आणि टिंगलटवाळी करण्यासारखा प्रकार घडला. अक्षय शिंदे हा कुणी महात्मा, महापुरुष किंवा क्रांतीवीर आजिताब नव्हता, तो विकृत गुन्हेगार होता त्याची शिक्षा अटळ होती. परंतू त्याला शिक्षा होता कायद्याची प्रक्रिया संपूर्ण पार पाडली गेली नाही. त्यामुळं या प्रकरणातील तपासावर आमचे आक्षेप काय आहेत आणि कशासाठी आहेत? हे आम्ही स्पष्ट करत आहोत"

Sushma Andhare
Akshay Shinde Encounter: कोण आहे अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करणारा ऑफिसर... प्रदीप शर्मांसोबत केलं आहे काम

कुठले मुद्दे केले उपस्थित?

1) अक्षयला तळोजाहून बदलापूरला नेताना एमआयडीसीतून चांगला रस्ता असताना मुंब्र्यातून का नेलं? पोलिसांनी चार्जशीट रविवारच्या दिवशी तडकाफडकी फाईल करण्याची गरज का होती? संध्याकाळी पाच वाजता त्याला बाहेर न्यावसं वाटतं हे संशयास्पद आहे. ज्या पिस्तुलानं अक्षय शिंदेवर गोळी झाडली गेली ते पिस्तुल ९ एमएम आहे. हे पिस्तुल खासगीत कुठेही मिळत नाही, याचं ट्रेनिंग फक्त पोलिसांना असतं, मग हे अक्षय शिंदे हे पिस्तुल चालवायला कसा शिकला? याचं लॉक ट्रेनिंगशिवाय कोणालाही काढता येत नाही. दोन्ही हातात बेड्या असणारा माणूस पोलिसांच्या कमरेला लावलेल्या होस्टरमधून पिस्तूल काढून त्यानं कसा काय गोळीबार करतो. घटना घडली तेव्हा तो पोलिसांच्या गाडीत नेमका बाकावर बसला होता की खाली?

2) एकनाथ शिंदे यांचे अधिकृत प्रवक्ते संजय शिरसाट यांनी या सर्व प्रकरणावर संशय व्यक्त केला आहे.

३) जेव्हा अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणावर चहूकडून टीकेची झोड उठवली जाते तेव्हा फडणवीसांनी सांगितलं की, आम्ही चौकशीचे आदेश दिले आहेत. पण यापूर्वी तुम्ही चौकशीचे आदेश दिलेली कुठली चौकशी पूर्ण झाली ते सांगा? ड्रग्ज प्रकरणात कुठलं नेक्सस बाहेर आलं? वसई-विरार प्रकरणात रस्त्यात तरुणीची हत्या झाली काय केलं तुम्ही? कोयता गँगनं हैदोस घातला काय केलं तुम्ही? संकेत बावनकुळे आणि वामन म्हात्रे प्रकरणात कायदेशीर प्रक्रिया फॉलो करावी लागेल असं फडणवीस म्हणाले होते. मग अक्षय शिंदेला गोळ्या घालताना कायदेशीर प्रक्रिया आठवली नाही का? सीसीटीव्ही फुटेज नेमके तुमच्या वेळेसच कसे गायब होतात? शाळेचे सीसीटीव्ही आणि संकेत बावनकुळे यांच्या प्रकरणात सीसीटीव्ही कुठे गेले? ज्या शाळेत सीसीटीव्ही नव्हते ती शाळा तुम्ही का वाचवत आहात? हे तुम्हाला कितपत योग्य वाटतंय?

४) काल उज्ज्वल निकम घाईघाईत अक्षय़ शिंदे प्रकरणावर बोलत होते, ते भाजपचे प्रवक्ते आहेत. ज्या माणसाचा एन्काऊंटर झाला आहे त्याची आत्महत्या ठरवण्यासाठी जो माणून हायकोर्टात सुप्रीम कोर्टात केस लढवतो तो माणूस भाजपत गेल्यावर आपला सद्सद् विवेक किती गहाण ठरतो? हे त्याचं फार मोठं उदाहरण आहे.

अशा शब्दांत सुषमा अंधारे यांनी अक्षय शिंदे प्रकरणात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.