Akshay Shinde: एन्काऊंटर पूर्वी अक्षय शिंदे आपल्या आईशी शेवटचं काय बोलला?

Akshay Shinde Death: बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्या अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला आहे. या चकमकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
Akshay Shinde
Akshay ShindeESakal
Updated on

बदलापूर येथील शाळेतील निष्पाप मुलींचे शोषण करणारा आरोपी अक्षय शिंदे पोलिसांच्या चकमकीत ठार झाला आहे. आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांच्या गाडीतून रिव्हॉल्व्हर हिसकावून पोलिस पथकावर गोळीबार केल्याचे समोर आले आहे. आरोपींनी पोलिस पथकावर अनेक राऊंड गोळीबार केला, ज्यात पोलिस अधिकारीही जखमी झाले. पोलिसांचे पथक तळोजा कारागृहातून अक्षयला घेऊन जात असताना हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

यावर अक्षय शिंदेंच्या कुटुंबियांनी प्रतिक्रिया दिली. अक्षय शिंदेची आई म्हणाली की, आम्ही जेव्हा अक्षय शिंदेला इथे घेऊन का येत नाही, असं विचारलं होतं तेव्हा पोलिसांनी आम्हाला सांगितलं होत की, त्याला इथे घेऊन आलो तर त्याला मारून टाकतील. त्याचा रिपोर्ट मोठा आहे. मी माझ्या मुलासोबत बोललीही होती. तेव्हा त्याने मला विचारलं होतं आई मला कधी सोडवणार. माझी चार्जशीट पण आली आहे. त्यावर मी म्हणाले थांब जरा बघू आपण, करू सुटका. एक कागद त्याच्या हातात होता. माझ्या पोराला मारून टाकलं आहे. माझ्या पोराची भरपाई करून द्या. नाहीतर आम्हाला पण गोळ्या घाला. माझ्या पोराने कधी फटाकडी नाही वाजवली तर गोळी कशी घालेल.

Akshay Shinde
Akshay Shinde: त्याला साधी होळीची पिचकारी बंद करता येत नाही, तो गोळी कशी झाडेल? अक्षयच्या बापाने हंबरडा फोडला

माझ्या पोराची मी वाट बघत होते. माझा पोरगा कधी येईल. माझा मुलगा असं करू शकत नाही. अत्याचार प्रकरणात माझ्या पोरावर खोटे आरोप लावले आहेत. दुसरं कुणी अत्याचार केले आणि माझ्या पोरावर नाव टाकले आहे. १२ तारखेला घटना झाली आणि माझा पोरगा १७ तारखेपर्यंत गेला आहे. त्याने असं काही केलं असतं तर कशाला गेला असता कामाला? माझा पोरगा भोळा आहे, तो असं करू शकत नाही. त्याला गोळ्या घालून मारून टाकलं आहे. आता आम्हाला पण गोळ्या घालून मारा. आम्ही पण आता मरणार आहोत, असं एका वृत्तवाहिनीवर अक्षय शिंदेची आईने सांगितलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.