मुंबई : हिवाळ्यात शरीराला उष्णता मिळावी, यासाठी अनेकजण दारूचे सेवन (Alcohol addiction) करतात. परंतु, थंडीच्या मौसमात (winter) अतिमद्यपान करणं हृदयासाठी घातक (injurious to heart) ठरू शकते. कारण, मद्यपान केल्याने शरीराचे कोअर तापमान कमी होतं आणि हायपोथार्मियाचा (hypothermia risk) धोका वाढतो. हृदयाच्या स्नायूवर अल्कोहोलच्या थेट विषारी प्रभावामुळे, हृदय कार्यक्षमतेने रक्त पंप करू शकत नाही. या स्थितीत हार्ट फेल्युअर होऊन हृदयविकाराचा झटका (Heart attack) येऊ शकतो. म्हणूनच थंडीच्या दिवसात हृदयाची काळजी घेण्यासाठी मदयपान टाळा, रक्तातील साखरेची पातळी व रक्तदाब तपासून पहा, असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टर करतात.
हायपोथार्मिया म्हणजे काय ?
उष्णता तयार करण्यापूर्वीच शरीराची उष्णता लक्षणीय कमी होणं याला हायपोथार्मिया असं म्हणतात. यामुळे शरीर थरथरणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि रक्तदाब कमी होणे असा त्रास होतो. सामान्यतः शरीराचं तापमान हे 37 अंश सेल्सिअस असते. मात्र मद्यपान केल्याने ते 35 अंश सेल्सिअसपर्यंत कमी होते. यामुळे बोलणं, चालण्यात अडखळणं आणि त्वचा थंड पडू लागते. जास्त थंडीत मद्यपान केल्यानं हायपोथार्मियाचा गंभीर स्वरुपात त्रास होऊ शकतो.
खासगी रुग्णालयातील सल्लागार कार्डियाक सर्जन डॉ बिपीनचंद्र भामरे यांनी सांगितले की, “ अतिमद्यपानामुळे हृदयावरच नव्हेतर शरीरावरही विपरित परिणाम होतो. जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने हृदयाच्या स्नायूंना नुकसान होऊन ती कमकुवत होतात. ज्यामुळे हृदयाचे पंपिंग व्यवस्थित होत नसल्याने हृदयाचा झटका येऊ शकतो. हिवाळ्यात थंडीमुळे अनेक जण दारूचे सेवन करत असल्याने त्यांना हृदयाची समस्या उद्भवत असल्याचे दिसून येत आहे. बहुतांश रूग्ण उच्च रक्तदाब, मधुमेह, रक्तवाहिन्यांचे नुकसान अशा तक्रारी घेऊन उपचारासाठी येतात. मधुमेहामुळे उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्ट्रॉलची शक्यता वाढते. उच्च रक्तदाब हृदयाच्या स्नायूंना जाड करतो आणि नंतर हृदयविकाराचा झटका येतो. ”
व्यायाम करा आणि ठेवा हृदयाला निरोगी
हदयविकार तज्ज्ञ डॉ. अमित पाटील म्हणाले की, “ जीवनशैलीत योग्य तो बदल केल्यास हृदयविकाराची समस्या टाळता येऊ शकते. यासाठी नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे. हृदयाची समस्या असलेल्यांनी अधिक व्यायाम करणं टाळावेत, धुम्रपान व मद्यपान करू नयेत, प्रक्रिया केलेले खादयपदार्थ खाणे टाळावेत. हृदयविकारापासून बचाव करण्यासाठी नियमित हृदयाची तपासणी करणे आवश्यक आहे. छातीत दुखणे आणि जडपणा, अशक्तपणा, सतत घाम येणे यासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.