मुंबई : देशात आर्थिक मंदी असतानाही राज्यातील मद्यविक्री "झिंगाट' असल्याचे दिसते. एप्रिल 2019 ते डिसेंबर 2019 दरम्यान मद्यविक्रीतून 1283 कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळाला असून, हा आकडा मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत सुमारे सहा कोटींनी जास्त आहे.
देशातील आर्थिक मंदीमुळे रोजगारांना कात्री लागली असून, महागाई वाढल्याने सामान्यांचे कंबरडे मोडले आहे, परंतु मद्यप्रेमींवर फारसा परिणाम झाल्याचे दिसत नाही. गेल्या पाच वर्षांतील आकडेवारी लक्षात घेतल्यास मद्यविक्रीत वाढच झाल्याचे आढळते. देशी दारू, बिअर, भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तिजोरीत मोठी भर पडत आहे.
हे सुद्धा वाचा आता एमएसईबी देणार मोठा शॉक, वाचा संपूर्ण बातमी
नाताळ आणि नववर्षाच्या निमित्ताने राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्यविक्रीच्या विरोधात विशेष मोहीम राबवली होती. त्यामुळे अधिकृत मद्य दुकानांमधून होणाऱ्या विक्रीत वाढ झाल्याचे सांगण्यात आले.
हे वाचलेय का... दाऊदला तुडवणारा करीम लाला होता तरी कोण?
मद्यविक्रीतून तिजोरीत भर
वर्ष महसूल
(कोटी रुपये) देशी
(लाख बल्क लि) विदेशी
(लाख बल्क लि) बीयर
(लाख बल्क लि) वाईन
(लाख बल्क लि)
२०१५-१६ १२४६९.८४ ३१६३.०६ १८६३.८१ ३२८४.०३ ५९.२१
२०१६-१७ १२२८७.९० ३२५६.९९ १९२३.५६ ३२४८.४३ ६४.६२
२०१७-१८ १३४४९.६५ ३१२८.०५ १७९२.३७ २७६०.३८ ६०.५६
२०१८-१९ १५३२२.७८ ३५०४.२० २०७७.१६ २९८८.३६ ७३.९५
एप्रिल-डिसे. २०१९ ११५५४.७५ २७१३.६७ १६२३.९६ २३४२.३८ ५४.१०
धक्कादायक... पालीजवळ एसटी बस अपघातात 20 विद्यार्थी जखमी
लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या काळात अवैध मद्यविक्रीवर कारवाई केली होती. राज्याच्या सीमा भागातही बनावट विदेशी मद्य, हातभट्टीची वाहतूक व विक्रीवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. त्यामुळे आता अधिकृत दुकानातूनच मद्यविक्री होत असल्याने एप्रिल ते डिसेंबर 2019 या नऊ महिन्यांत महसुलात 10 टक्के वाढ झाली आहे.
- प्राजक्ता वर्मा लवंगारे, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क
Alcohol sales rise even in economic recession
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.