मुंबई : कोरोना रुग्णांसाठी दिलासादायक ठरत असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात तुटवडा असल्याने रुग्णांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्रातील रुग्णांची वाढती संख्या आणि कोरोना रुग्णांचे होणारे हाल लक्षात घेता रुग्णांना तातडीने रेमडेसिवीर लस मिळावी यासाठी महाराष्ट्रातील ऑल फूड अॅण्ड ड्रग्स लायसन्स होल्डर फाऊंडेशन ही संस्था पुढे सरसावली आहे. बांग्लादेशमधून तब्बल पाच हजार रेमडेसिवीर लस आयात करण्याची ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (डीसीजीआय) परवानगी मागितली आहे. ही लस 'ना नफा, ना तोटा' या तत्त्वावर राज्यातील रुग्णांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात सध्या दोन लाखांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण असून, नऊ हजार कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातच रेमडेसिवीरमुळे रुग्णांना दिलासा मिळत असल्याने अनेक सरकारी आणि खासगी हॉस्पिटलमध्ये या लसीचा वापर होत आहे. परंतु मागणीच्या तुलनेत लस उपलब्ध नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.
ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्रातील ऑल फूड अॅण्ड ड्रग्स लायसन्स होल्डर फाऊंडेशन ही औषध क्षेत्रातील संघटना पुढे सरसावली आहे. महाराष्ट्रातील औषध आयात करण्याचा परवाना असलेल्या व्ही.जे.फार्मा कंपनीशी संपर्क साधत त्यांना पाच हजार रेमडेसिवीर आयात करण्याची विनंती केली.
त्यानुसार ही.जे.फार्माने रेमडेसिवीर बनवणार्या बांगलादेशमधील इस्कायेफ फार्मास्यिुटीकलकडे पाच हजार लस महाराष्ट्राला देण्याची मागणी केली. इस्कायेफने पाच हजार लस पुरवण्याची तयारी दर्शवली आहे. ही लस आयात करण्यासाठी डीसीजीआयची परवानगी आवश्यक असल्याने व्ही.जे. फार्माने डीसीजीआयला परवानगीसंदर्भात पत्र पाठवले आहे. ही परवानगी मिळताच रेमडेसिवीर लस तातडीने महाराष्ट्रातील रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही लस राज्यातील सरकारी, खासगी हॉस्पिटलमधील रुग्णांना 'ना नफा, ना तोटा' या तत्त्वावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे ऑल फूड अॅण्ड ड्रग्स लायसन्स होल्डर फाऊंडेशनने अध्यक्ष अभय पांडे यांनी सांगितले.
कोरोनाचे उपचार व्हावे म्हणून रेमडेसीवर हे इंजेक्शन राज्यात सध्या वापरले जात आहे. मात्र, याचा अजूनही पूर्ण पुरवठा राज्यात झालेला नाही. शिवाय, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोणत्याही नफ्याशिवाय हे इंजेक्शन आहे, त्याच किंमतीत रुग्णांपर्यंत पोहोचवले जाईल. मात्र, त्यासाठी ड्रग कंट्रोलर ऑफ इंडिया आणि सरकारची परवानगी आणि मंजूरी महत्वाची आहे. परवानगी मिळाली की 2 दिवसांत 5000 इंजेक्शन राज्यात उपलब्ध होतील.
- अभय पांडे, अध्यक्ष, ऑल फूड ड्रग्ज अॅण्ड लायसंस होल्डर फाउंडेशन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.