मुंबई : कोरोनाच्या वाढत्या रूग्णांच्या (corona pandemic) पार्श्वभूमीवर अर्ध्याहून अधिक राज्यातील निवासी डॉक्टर्स (Resident doctors) गुरुवारपासून अनिश्चितकालीन संपावर (indefinite strike) गेले आहे. उद्या, शुक्रवारपासून (31 डिसेंबर) सर्वच वैद्यकीय महाविद्यालयांचे निवासी डॉक्टर सकाळी 11 वाजल्यापासून संपावर उतरतील. यामुळे, कोव्हिड संकटाच्या वेळी रुग्णांना पुन्हा एकदा त्रास होऊ शकतो. गुरुवारी झालेल्या संपाच्या पहिल्या दिवसामुळे मुंबईच्या सरकारी रूग्णालयात (Mumbai government hospital) त्याचा प्रभाव कमी आहे, कारण डॉक्टरांनी दुपारनंतर संप सुरू केला. (All medical colleges resident doctors indefinite strike starts from tomorrow Friday)
नीट पीजी प्रवेश प्रक्रियेला विलंब झाल्याबद्दल दिल्लीत आंदोलन करणाऱ्या निवासी डॉक्टरांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीविरोधात मुंबईसह राज्यातील डाॅक्टर्स संपावर गेले आहेत. झाल्यामुळे वरिष्ठ निवासी डॉक्टरांवर कामाचा भार वाढला आहे. यासाठी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या डाॅक्टरांवल पोलिसांनी चुकीची वागूणक दिली. यातून फेडरेशन ऑफ निवासी डॉक्टर असोसिएशनच्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्र वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर्स संपावर उतरले आहेत.
सेंट्रल मार्डचे अध्यक्ष डाॅ. अविनाश डाॅ. अविनाश दहिफळे यांनी सांगितले की, राज्यात 1 9 मेडिकल कॉलेज आहे. गुरुवारपासून अर्ध्याहून अधिक वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर संप करत आहेत. तर, उर्वरित मेडिकल कॉलेज आजपासून संप करत आहेत. बहुतांश वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये डॉक्टर आपातकालीन आणि कोविड वाॅर्ड सोडून ओपीडी, वॉर्डमध्ये सेवा देणार नाहीत.
दरम्यान, मुंबईतील सायन, केईएम आणि जेजे येथील निवासी डॉक्टरांनी गुरुवारी दुपारपासून संप सुरू केला आहे. तर नायर रुग्णालयातील निवासी डॉक्टर शुक्रवारपासून संपावर केले आहेत. सध्या, सायन आणि केईएममध्ये कोविड सेवा वगळता निवासी डॉक्टर ओपीडी, वॉर्ड ड्युटी, ओटीमध्ये सेवा देणार नाहीत. तर जेजेचे निवासी डॉक्टर केवळ कोविड आणि आपत्कालीन परिस्थितीतच त्यांची सेवा देतील.
केईएम मार्डचे अध्यक्ष डॉ. सचिन पट्टीवार म्हणाले की, निवासी डॉक्टर फक्त कोविड वॉर्ड आणि आयसीयूमध्ये सेवा देतील जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत संप सुरू राहिल. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले की, पालिका रुग्णालयातील निवासी डॉक्टरांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रुग्णांना कोणतीही अडचण होऊ नये म्हणून सर्व वरिष्ठ डॉक्टरांना ड्युटीवर ठेवण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.