मुंबई : मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी आंदोलक मनोज जरांगे यांनी काही मागण्या सरकार समोर ठेवल्या आहेत. तर दुसरीकडं याला ओबीसी नेत्यांनी कडाडून विरोध केला आहे. यापार्श्वभूमीवर सर्वमान्य तोडगा निघावा यासाठी आज सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन सह्याद्री अतिथीगृहावर करण्यात आलं होतं.
या बैठकीच्या सुरुवातीलाच गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं. तसंच सगे-सोयऱ्यांचा शासन निर्णय काढू नका, असा सूर यावेळी ओबीसी नेत्यांमध्ये पाहायला मिळाला. (All party meeting maharashtra do not decide governance of Sage Soyare tone of OBC leaders)
ओबीसी नेत्यांचं म्हणणं काय?
जर सगे-सोयरे हा शासन निर्णय काढला तर ओबीसींचं फार मोठ नुकसान होईल. त्याचसोबत कुणबी प्रमाणपत्र देण्याचंही थांबावा, अशा प्रकारची भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतली. यावेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्र्यांनी ऐकून घेण्याची भूमिका घेतली.
विरोधकांचा बैठकीवर बहिष्कार
दरम्यान, बैठकीत विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे विरोधीपक्ष नेते अर्थात विधानसभेचे विजय वडेट्टीवार तसंच अंबादास दानवे यांनी बहिष्कार टाकला. त्यामुळं ही बैठक सर्वपक्षीय असली तरी त्यात विरोधीपक्षाचं प्रतिनिधीत्व दिसलं नाही. बैठकीला विरोधकांनी दांडी मारल्यानं बैठकीत विरोधकांच्या खुर्च्या रिकाम्या दिसल्या. त्यामुळं विजय वडेट्टीवार, नाना पटोले, जयंत पाटील, अंबादास दानवे यांच्या नावाच्या खुर्च्या रिकाम्या होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.