मुंबई : पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. मुंबईचे महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मुंबईतील शाळांबाबत अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या ३१ डिसेंबरपर्यंत मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा बंद राहणार आहेत. केवळ मुंबई महापालिकेच्या शाळाच नव्हे तर मुंबईतील सर्व सरकारी आणि खासगी शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत.
खरंतर राज्य सरकारने दिवाळीनंतर २३ तारखेपासून शाळा सुरु करण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर शाळांचं सॅनिटायझेशन आणि इतर गोष्टी सुरु झाल्यात. मात्र मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मनपा आयुक्तांना असणारे विशेष अधिकार वापरत मुंबईतील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयामागील महत्त्वाचे कारण म्हणजे, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव हेच असल्याचं समजतंय. त्यामुळे आता मुंबईतील शाळा पुढच्या वर्षीच खुल्या होणार आहेत.
महत्त्वाची बातमी : भातखळकरांकडे मुंबईची जबाबदारी देऊन भाजपने आशिष शेलारांचे पंख छाटले ?
३१ डिसेंबरपर्यंत मुंबईतील सगळ्या शाळा बंद ठेवण्यात येण्याच्या निर्णयानंतर पुढे कशाप्रकारे शाळा सुरु करायच्या, अभ्यासक्रम कमी करायचा का, परीक्षा कशा प्रकारे घ्यायच्या या सर्व नियोजनासाठी आता प्रशासनाला अधिकचा वेळ मिळणार आहे. नुकत्याच मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये कोरोना टेस्टिंग कॅम्प सुरु करण्यात आले आहेत. मुंबईतील विविध शाळांमध्ये सॅनिटायझेशन केलं जातंय. शिक्षकांच्या देखील कोरोना चाचण्या सुरु केल्या गेल्या आहेत. कालपासून या मास टेस्टिंगला सुरवात झालीये.
दरम्यान, दिवाळीनंतर कोरोनाचा वाढत आकडा पाहता मुंबईतील शाळा बंद ठवण्याचा निर्णय मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चाहूल यांनी घेतल्याचं समजतंय. आता मुंबईच्या पावलावर पाऊल ठेऊन इतर महापालिका देखील असा निर्णय घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
all schools in mumbai municipal corporation territory to remain close till 31st December
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.