उल्हासनगर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार कुमार आयलानी यांच्यावर मतदारांना पैसे वाटल्याचा गंभीर आरोप मनसे उमेदवार भगवान भालेराव यांनी केला आहे. या प्रकरणामुळे उल्हासनगरच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून, निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.