Corporations Allotment
Corporations AllotmentESakal

महामंडळाचा प्रसाद फक्त शिंदे गटाला? हेमंत पाटलांसह संजय शिरसाटांवर नवी जबाबदारी; नाराज आमदारांचे राजकीय पुनर्वसन

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे गटातील आमदारांना महामंडळांचं वाटप केले आहे. अशातच अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकही महामंडळ का नाही? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
Published on

अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला महामंडळं येणार नाहीत का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. कारण एकनाथ शिंदे गटात महामंडळाचे वाटप सुरू आहे. शिंदे गटातील नाराज आमदारांना महामंडाळांचं वाटप करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. शिंदे गट त्यांच्या नाराज आमदारांचे राजकीय पुनर्वसन करण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा आता रंगत आहे. मात्र दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकही महामंडळ का नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.

Loading content, please wait...