Mumbai Traffic: दुष्काळात तेरावा महिना! आधीच जम्बो ब्लॉक, त्यात मुंबईकर खासगी वाहनाने बाहेर पडल्याने प्रचंड वाहतूक कोंडी

विशेष म्हणजे आजपासून तीन दिवस मध्य रेल्वेवर जम्बो ब्लॉक आहे. त्यामुळे जवळपास सर्वच रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
Mumbai Traffic
Mumbai Traffic
Updated on

मुंबई- मुलंड ऐरोली मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. ट्रेलर घसरल्यामुळे मुंबईकडून ऐरोलीला येणारी वाहतूक संथ गतीने होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दीड ते दोन किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत. विशेष म्हणजे आजपासून तीन दिवस मध्य रेल्वेवर जम्बो ब्लॉक आहे. त्यामुळे जवळपास सर्वच रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. आज मुंबईकरांना दुहेरी त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

रस्त्यावर अपघातग्रस्त झालेल्या ट्रेलरला बाजूला करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ट्रेलर बाजूला केल्यानंतर सुद्धा वाहतूक कोंडी राहण्याची शक्यता आहे. कारण, आज मध्य रेल्वेवर जम्बो ब्लॉक असल्याने वाहतूक कोंडी कायम राहण्याची शक्यता आहे. जम्बो ब्लॉक असल्याने अनेकजण स्वत:च्या खासगी वाहनाने बाहेर पडले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी आज दिवसभर राहणार आहे.

Mumbai Traffic
Mumbai Local News: मेगा ब्लॉकसाठी टीएमटीसह लालपरी सज्ज, अतिरिक्त बस उपलब्ध

मध्य रेल्वे वरील जम्बो ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळत आहे. आपल्या खाजगी वाहनाने मुंबईकर हे कामाच्या दिशेने निघालेले आहेत. त्यामुळे मुलुंड ते कांजूरच्या दरम्यान पूर्व द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येत आहे.

मध्य रेल्वेवर करण्यात आलेला मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचे सध्या हाल होताना बघायला मिळत आहेत .अनेकांना या मेगा ब्लॉकची कल्पना अजूनही नाही. त्यामुळे घरी कसे जायचे? असा प्रश्न त्यांना पडला.

Mumbai Traffic
Mumbai Local News: तीन दिवसांचा मेगाब्लॉक मागे घ्या, राष्ट्रवादी काँग्रेसची रेल्वेकडे मागणी

मध्य रेल्वेवर ठाणे आणि सीएसटी स्थानकावर प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणाच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे. ठाणे येथे हा मेगाब्लॉक सुरू झालेला असून सीएसटी आणि स्थानकावर 31 मे रोजी रात्री हा मेगाब्लॉक सुरू झाला. त्यासाठी प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणासाठी जितक्या गोष्टी आणि साधनसामुग्री लागतात त्या आणण्यात आल्याचं दिसून येतंय .

CSTM स्थानकावर मेगाब्लॉक प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणाच्या निमित्ताने सध्या घेण्यात येत आहे. या प्लॅटफॉर्मवर रुंदीकरणाचे काम झालं असल्याचं दिसून येतंय. मात्र अखेरच्या टप्प्यातील महत्त्वाची कामे आणि ट्रॅक जोडणीची कामे बाकी असल्यानं हा मेगा ब्लॉक घेण्यात आला असल्याची माहिती मिळते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.