मी घराबाहेर पडलो नसलो तरी असमर्थ आहे असं नाही - उद्धव ठाकरे

"तलवार हातात नसली तरी ती कधी आणि कशी चालवायची हे माझ्या नसानसात भिनलंय"
uddhav-thackeray
uddhav-thackeraySakal
Updated on

मुंबई : मुख्यमंत्री कुठे आहेत? असा वारंवार सवाल करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज उत्तर दिलं आहे. "मी घराबाहेर पडलो नसलो तरी मी असमर्थ आहे असं नाही, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना उत्तर दिलंय आहे. मुंबई महापालिकेच्यावतीनं उभारण्यात आलेल्या महाराणा प्रताप (Maharana Pratap) यांच्या अश्वारुढ पुतळ्याचं उद्घाटन ऑनलाइन स्वरुपात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, यावेळी ते बोलत होते. (Although I am not out of the house it doesnt mean I am incapable says CM Uddhav Thackeray)

uddhav-thackeray
Omicronच्या संसर्गाची नवी लक्षणं! कानदुखीच्या तक्रारी वाढल्या

मुख्यमंत्री म्हणाले, "गेल्या काही काळामध्ये एका शस्त्रक्रियेला मला समोरं जावं लागलं. त्यानंतर मी अजूनही तसा घराबाहेर पडलेलो नाही पण असं असलं तरी याचा अर्थ असा नाही की, मी बाहेर पडायला असमर्थ आहे. मी सुद्धा शिवसेनाप्रमुखांचा पुत्र आहे. तलावर जरी माझ्या हातात नसली तरी तलावर कशी गाजवायची हे माझ्या नसानसांत भिनलेलं आहे. त्यामुळं जेव्हा फिरवायची त्या योग्यवेळी ती फिरवत आलेलो आहेच आणि यापुढेही फिरवणार आहेच. शिवसेना प्रमुखांच्या पुण्याईनं सर्व शिवसैनिक माझ्या आणि आदित्यच्या पाठिशी आहात त्यामुळं धन्यवाद"

uddhav-thackeray
चंद्रशेखर आझाद म्हणाले, गोरखपूरमधून निवडणूकही जिंकेन, सरकारही बनवणार

शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिवसादिनीच वीर महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचं आपण अनावरण केलं आहे. पुतळे बसवायला अनेक जागा आहेत पण नेमका आपण कोणाचा वारसा सांगत आहोत हे सांगण्याचं, आठवण देण्याचं काम तुम्ही केलं आहे. शिवाजी महाराज किंवा महाराणा प्रताप आपण होऊ शकत नाही पण त्यांचा घोडा म्हणजेच चेतक जरी आपण झालो तरी आपल्याकडून मोठ काम होईल. हा घोडा आपल्या धन्याचा निष्ठावान होता.

uddhav-thackeray
''हम मुंबई के स्कुल और कॉलेज में धमाके करेंगे'' ठाणे पोलीस शाळेला धमकीचा मेल

मुंबई महापालिकेच्यावतीनं महाराणा प्रताप चौकाच्या सुशोभिकरणाचं काम हाती घेण्यात आलं आहे. यावेळी या चौकात महाराणा प्रताप यांचा भालाधारी १६ फूट उंचीचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात आला. याचं अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रविवारी पार पडलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.