अंबरनाथ पालिकेच्या "सुपर 30" टीमचा पॅटर्न यशस्वी; पाच हजार चाचण्या पूर्ण!

अंबरनाथ पालिकेचा "सुपर 30" टीमचा पॅटर्न यशस्वी; पाच हजार चाचण्या पूर्ण!
अंबरनाथ पालिकेचा "सुपर 30" टीमचा पॅटर्न यशस्वी; पाच हजार चाचण्या पूर्ण!
Updated on

अंबरनाथ : अंबरनाथ पालिकेच्या माध्यमातून अंबरनाथ शहराला कोरोनामुक्त करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबवत आहे. गेल्या दोन महिन्यापासून "सुपर 30" टीमची नियुक्ती करण्यात आली आहे. या टीमतर्फे शहरातील रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. या टीममुळे कोरोनाच्या संपर्कांपासून नागरिक सुरक्षित राहण्यास मदत होत आहे. एका रुग्णाच्या संपर्कातील सुमारे 25 ते 30 नागरिकांची तपासणी यामुळे सुलभ पणे होऊ शकते.  

अंबरनाथ नगरपरिषदेत अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. धीरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या "सुपर 30" टीम तयार करण्यात आली आहे. या टीमचे विभाजन हे सहा झोनमध्ये करण्यात आले आहे. या सहा झोनमधील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी 6 स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांक सुद्धा जाहीर करण्यात आले आहेत. एखादा कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यावर "सुपर 30" मधील स्वयंसेवक हे त्या रुग्णाच्या घरी जातात व गेल्या काही दिवसात तो रुग्ण कुठे होता? कोणा कोणाच्या संपर्कात आले? कुठे बाहेर गेला होतात का? अशा प्रकारे त्या रुग्णाचा संपूर्ण तपशील घेतला जातो. 

एका रुग्णामागे जवळजवळ 25 ते 30 लोकांचा शोध घेतला जात असून, दुसऱ्या दिवशी लगेच मोबाईल टीम जाऊन त्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची कोविड अँटीजेन चाचणी केली जात आहे. अंबरनाथ शहराला कोरोना मुक्त करण्यासाठी "सुपर 30" टीम व मोबाईल टीम महत्वाची भूमिका बाजवताना दिसत आहे. 

आजपर्यंत शहरात सुमारे पाच हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. पालिकेतर्फे तेरा हजार अँटीजेन टेस्ट करण्यात येणार आहेत. नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करावे. शहरातील रिक्षाचालक आणि फेरीवाले यांचीही अँटीजेन टेस्ट पालीकेतर्फे करण्यात येणार आहे.
- डॉ. प्रशांत रसाळ, मुख्याधिकारी, अंबरनाथ. 

सुपर 30 टीमच्या विभागाचे संपर्क क्रमांक : 7249737801, 7249737802, 7249737803, 7249737804, 7249537805, 7249587806.   
---------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.