Latest Badalapur News: अंबरनाथ विधानसभा मतदार संघासाठी राष्ट्रीय समाज पक्षाकडून, पक्षाचे जिल्हाध्यक्ष रुपेश थोरात यांना उमेदवारी जाहीर झाली असून. पक्षाने त्यांच्या नावावर अखेर शिक्कमोर्तब केले आहे.राष्ट्रीय समाज पक्षाने २५ विधानसभा मतदार संघाच्या उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली असून, या यादीत अंबरनाथ विधानसभा जागेचाही समावेश आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर गणेशोत्सवात बदलापूर रुपेश थोरात यांच्या निवासस्थानी गणेश दर्शनासाठी आले होते. त्याचवेळी त्यांनीं महायुतीत विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप करीत, विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार गुरुवारी राष्ट्रीय समाज पक्षाची २५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली असून, लवकरच इतर मतदार संघातील उमेदवार जाहीर होण्याची चिन्हे आहेत.