कल्याण शीळ रोडवरील कोंडीत अडकल्या रुग्णवाहिका

तीन रुग्णवाहिकांना वाट काढून देताना वाहनचालक हतबल
Ambulance stuck in traffic
Ambulance stuck in trafficsakal media
Updated on

डोंबिवली : कल्याण शीळ रोडचे (Kalyan shil road) सहा पदरीकरणाचे सिमेंट काँक्रीटीकरणचे काम सुरू असल्याने या रस्त्यावर सकाळ संध्याकाळ वाहतूक कोंडीचा (traffic issue) सामना वाहनचालकांना करावा लागतो. गेले तीन चार दिवस भर दुपारीही या रस्त्यावर वाहन कोंडी होत असून मंगळवारी या कोंडीचा फटका रुग्णवाहिकाना (Ambulance) बसला. एक नाही तर तब्बल 3 रुग्णवाहिका या कोंडीत अडकल्या होत्या.

Ambulance stuck in traffic
पनवेल : महागड्या दुचाकीची पोलिसांना भुरळ; तपासणीनंतर चक्क फोटोसेशन

समोरून पाठून दोन्ही दिशेने येणाऱ्या रुग्णवाहिकाना वाट काढून देताना वाहनचालकांना ही कठीण होत आहे. वाहतूक नियोजन करण्यासाठी या भागात ट्रॅफिक पोलीस, वॉर्डन असून देखील नियोजन योग्य पद्धतीने होत नसल्याने कोंडीचा फटका सर्वांनाच बसत आहे. कल्याण शीळ रस्त्याचे सहा पदरीकरणाचे काम सुरू आहे. काही ठिकाणी सिमेंट काँक्रीटीकरण चे काम पूर्ण झाले आहे तर काही ठिकाणचे काम प्रगती पथावर आहे.

रस्त्याच्या एक दोन लेन च्या सुरू असलेल्या कामामुळे येथे दिवसभर वाहतूक कोंडी होत असल्याचे हल्ली पहायला मिळते. जुन्या काटई रेल्वे उड्डाणपूलाची एक दोन वर्षे आधीच दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र सध्या या पुलावरील रस्ता ओबडधोबड झालेला आहे. तर नवीन काटई पुलावर देखील एका बाजूने सिमेंट काँक्रीटीकरणचे काम झाले असून एक बाजू तशीच आहे. त्याच्या पूढे लागून पलावा जंक्शन आहे.

Ambulance stuck in traffic
वसई-विरार कचराकुंडी मुक्त होणार; रस्त्यावर कचरा टाकल्यास कारवाई

त्याठिकाणी वाहतूक कोंडी होते. कल्याण दिशेकडील रस्त्याचे मधल्या लेन मधील काम सुरू असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूचा मार्ग चिंचोळा झाला असून येथे कोंडी होते. अनेक ठिकाणी रस्ता खोदून ठेवला आहे, काम सुरू असल्याने रस्त्यावर खडी पडलेली असते. या खडीमुळे वाहने घसरून अपघात होण्याची शक्यता असते. वाहनचालक वाहनांचा वेग याठिकाणी कमी करत असल्याने देखील कोंडी होते. मंगळवारी भर दुपारी 4 च्या सुमारास या रस्त्यावर वाहनांची कोंडी झाली होती. मानपाडा पेट्रोल पंप ते प्रीमिअर मैदान पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

यामध्ये मुंबई दिशेला जाणाऱ्या 2 रुग्णवाहिका तर कल्याण दिशेला जाणारी एक रुग्णवाहिका अडकली होती. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही वाहनचालक हे विरुद्ध दिशेने वाहन काढतात. यावेळी दोन्ही दिशेने येणारी वाहने आमने सामने आल्याने कोंडीत आणखी भर पडते. वाहनांच्या तीन ते चार रांगा लागत असल्याने कोंडीत अडकलेल्या रुग्णवाहिकाना वाट काढून देताना वाहनचालकांना देखील कठीण होऊन बसते. वाहतूक नियोजन करण्यासाठी ट्रॅफिक पोलीस, वॉर्डन यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र चौकात नियोजन करण्यात सगळेच व्यस्त असल्याने इतर ठिकाणी होणारी कोंडीवर कोणाचा वचक नसल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.