मुंबई : राज्यावरील कोरोना संकट अद्याप टळलं नाहीये. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात आलंय. राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन खरंतर जुलै महिन्यात होणार होतं. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन पुढे ढकलून ३ ऑगस्टपासून घेण्याचं ठरलं. मात्र अजूनही राज्यावरील कोरोनाचा विळखा सैल झालेला नाही. आज कामकाज सल्लागार समितीची एक बैठक पार पडली. या बैठकीत कोरोनच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कोरोनामुळे आता पुन्हा एकदा राज्याचं पावसाळी अधिवेशन पुढे ढकललं गेलंय आणि ७ सप्टेंबरपासून घेण्यात येणार आहे.
कमी सदस्य संख्येत अधिवेशन नको :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व आमदारांना बोलावण्याऐवजी कमी सदस्य संख्येत पावसाळी अधिवेशन घेता येऊ शकेल का? याबाबत सरकारचा विचार सुरु होता. मात्र कमी सदस्यांमध्ये अधिवेशन घेण्यास विरोधीपक्षाने विरोध दर्शवला. कमी सदस्यांमध्ये अधिवेशन घेणं हे संविधानात बसणारं नाही, त्यामुळे याला आमचा विरोध असल्याचं फडणवीसांनी सांगितलंय
कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता
अधिवेशनामुळे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवावा लागतो, अनेक अधिकारी, पत्रकार, कर्मचारी हे विधानभवनात येत जात असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दीही होते. अशात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव होऊ शकतो. म्हणून कोरोनाचा संभाव्य धोका पाहता कामकाज सल्लागार समितीच्या आजच्या बैठकीत पुन्हा एकदा पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
amid corona maharashtras monsoon assembly session once again postponed
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.