लॉकडाऊन काळात खाण्याचे ट्रेंड बदलले; 'या' पदार्थांची मागणी घटली, तर 'यांची' वाढली..

लॉकडाऊन काळात खाण्याचे ट्रेंड बदलले; 'या' पदार्थांची मागणी घटली,  तर 'यांची' वाढली..
Updated on

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात FMCG कंपन्यांच्या विक्रीचे ट्रेंड बदलले आहेत. या काळात ग्राहकांच्या दैनदीन गरजेच्या वस्तुच्या यादीतही मोठे बदल झालेत. या काळात मॅगी, बिस्किट, ब्रेड, जाम, बटर, कॉफी ते गूडनाईट कॉईल, हँड सॅनिटायजर यासारख्या वस्तूंची तडाखेबंद विक्री झाली आहे. या काळात लोकांनी स्वच्छता, आरोग्य, रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याकडे अधिक लक्ष दिल्याने यासंबधीत उत्पादनांच्या विक्रीने जोर पकडला. मात्र ऐरवी लहान मुलांमधील लोकप्रिय फ्रूट केक आणि आईसक्रीमचा खप मात्र घसरला आहे. देशातील बड्या FMCG (फास्ट मूवींग कंज्यूमर गूड्स) कंपन्याच्या तिमाहीचा ताळेबंद जाहिर झाला आहे. त्यातून ही माहिती पुढे आली आहे. 

ब्रिटानीया

  • या वस्तुंचा खप वाढला- ब्रेड, चीज, बिस्कीट 
  • याची विक्री घटली- फ्रूटी केक, आईसक्रीम

एप्रिल-जून या महिन्यात ब्रेड, चीजचा खप वाढला. मात्र फ्रूट केकची विक्री कमी झाली आहे. फ्रूट केक हा विद्यार्थ्यांच्या टिफीन बॉक्सचा मुख्य मेन्यु असायचा, मात्र या काळात शाळा बंद असल्यामुळे केकची विक्री घटली आहे. विक्रीच्या बाबतीत ब्रेडने बिस्कीटांना मागे टाकले. कंपनीच्या दुग्धजन्य पदार्थात चीजची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली. या काळात घराघरात खाण्यामध्ये ब्रेडचे प्रमाण वाढल्याने, बिस्कीटापेक्षाही ब्रेडची मागणी वाढल्याचे ब्रिटानीयाचे कार्यकारी संचालक वरुन बेरी यांनी सांगीतले आहे. 

हिंदुस्थान युनिलीव्हर

  • या वस्तुंचा खप वाढला- जाम, केचप,सॅनिटायजर, ह़ॉर्लिक्स, हँडवाश,चहा 
  • खप घसरला - आईसक्रीम, स्किन केअर प्रोडक्ट, वॉटर पुरीफायर

लॉकडाऊनच्या काळात जाम आणि केचपची विक्री वेगाने वाढली. लॉकडाऊनमध्ये सर्व लहान मुल घरी होती. त्यामुळे स्वाभाविक जाम, केचप या पदार्थांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. या दरम्यान कंपनीच्या बूस्ट, हॉर्लिक्स सारख्या आरोग्यवर्धक उत्पादनाच्या मागणीत वाढ झाल्याचे वाढ झाल्याचे कंपनीचे कार्यकारी संचालक संजीव मेहता यांनी म्हटले. लाईफबॉय सॅनिटायझर, हँडवाशचा खप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र ही ताप्तुरती वाढ आहे. कोविड 19 ची लस आल्यानंतर कदाचित सॅनिटायझरचा खप कमी होईल. असही कंपनीचे म्हणणे आहे. मात्र या काळात कंपनीचा आईसक्रीम, वॉटर प्युरीफायर, स्क्रिन केअर उत्पादनांचा खप घसरला आहे.

गोदरेज 

  • या वस्तुंचा खप वाढला - गूडनाईट मॅट, हिट, साबण

कोरोना संसर्गाच्या काळात इतर आजार होऊ नये म्हणून लोक दक्ष होते. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये डेंग्यु, मलेरीया सारखे रोग टाळण्यासाठी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात मच्छर प्रतिबंधक गूडनाईट मॅट खऱेदी केल्यात. झुरळ मारणारे हिट चा खपही वाढला.

  • या वस्तुंचा खप वाढला - मॅगी, कॉफी, बुस्ट

नेस्ले इंडीयाच्या दूग्धजन्य पदार्थ आणि बूस्ट, रिसोर्स सारख्या वस्तुंची मागणी वाढली. मॅगीच्या विक्रीत 25 टक्के वाढ झाली आहे. कॉफीच्या खपातही वाढ झाली आहे. 

आयटीसी

  • या वस्तुंचा खप वाढला - सॅवलॉन, नीम फ्लोर क्लिनर

या काळात कंपनीने 12 हायजिनिक आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या वस्तू बाजारात आणल्या. यामध्ये सॅवलॉन, नीम फ्लोर क्लिनर यासारख्या उत्पादनांचा समावेश आहे. सॅवलॉन आणि घर साफ करणाऱ्या फ्लोर क्लिनरचा खप वाढला. मात्र कंपनीचे इतर स्टेशनरी उत्पादनांची मागणी कमी झाली आहे. 

( संकलन - सुमित बागुल )

amid corona sale of maggi jam butter bread increased whereas sale of ice cream and cake dropped

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.