हिंमत असेल तर १०५ आमदारांनी राजीनामे द्या! संजय राऊत यांचे प्रत्युत्तर

sanjay raut
sanjay rautsakal media
Updated on

मुंबई : हिंमत असेल तर राजीनामा देऊन पुन्हा निवडणुका घेऊन दाखवा, असे आव्हान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी महाविकास आघाडीला (mva government) दिल्यानंतर त्याला शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘तुमच्यात हिंमत असेल तर १०५ आमदारांनी राजीनामे (MlA resignation) द्यावेत, भाजपने तेवढे आमदार पुन्हा निवडून आणून दाखवावेत. ईडी (enforcement Directorate), सीबीआय (CBI) आणि एनसीबी (NCB) ही तीन चिलखत काढून लढावे, अशा शब्दांत शिवसेनेकडून भाजपला प्रतिआव्हान देण्यात आले.

sanjay raut
तुकाराम सुपे अखेर निलंबित; वर्षा गायकवाड यांची माहिती

भाजपच्या १०५ आमदारांनी राजीनामा देऊन दाखवावा. शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय १०५ आमदार निवडून येणे शक्य नव्हते. त्यामुळे राजीनामे देऊन पुन्हा १०५ आमदार निवडून आणून दाखवा, असे प्रतिआव्हान संजय राऊत यांनी दिले. हिंदुत्वाचा प्रश्‍न उपस्थित करून भाजपचे नेते महाराष्ट्रातील जनतेला भ्रमित करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता केंद्रीय नेतेही तीच री ओढत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत ५०-५० टक्के सत्तावाटप ठरल्याचे जाहीर केले होते.

पुणे ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. या ठिकाणी त्यांनी सोन्याचा नांगर फिरवला होता. त्यामुळे पुण्यात तरी शहा यांनी खोटे बोलू नये, असा टोलाही त्यांनी लगावला. सत्तेसाठी शिवसेनेने हिंदुत्व सोडले, या शहा यांच्या टीकेवर उत्तर देताना ‘२०१४ मध्ये शिवसेनेला दूर करा, असे सांगणारे कोण होते’, हे अमित शहांनी सांगावे. सत्तेसाठी शिवसेनेसोबत युती तोडणारे कोण होते, हेही स्पष्ट करावे. त्या निवडणुकांमध्ये पैसा, केंद्रीय सत्तेने तयार केलेली कृत्रिम लाटा शिवसेनेला रोखू शकली नव्हती’, असेही राऊत यांनी नमूद केले.

sanjay raut
महाराष्ट्रात ओमिक्रॉनच्या ५४ रुग्णांमधील ३१ जण कोरोनामुक्त

भाजपचा पराभव करावा लागेल

इंधनाच्या कर कपातीवरूनही अमित शहा यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला होता. त्यावर देशात इंधनाचे दर ५० रुपयांनी कमी करायचे असतील, तर भाजपचा परभाव करावा लागेल, असा चिमटा राऊत यांनी काढला.

हेमामालिनी बद्दल आदर

शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी ज्येष्ठ अभिनेत्री, खासदार हेमामालिनी यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून जोरदार टीका होत आहे. त्यावरून संजय राऊत म्हणाले, की यापूर्वीही अशी तुलना झाली आहे. हा हेमामालिनी यांच्याबद्दल असलेला आदर आहे. त्याचा नकरात्मक अर्थ घेऊ नये, आम्हाला हेमामालिनी बद्दल आदर आहे, असे त्यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.