Amit Shah: उद्धवजी मित्र होते, शरद पवारांनी तोडले...ज्यांनी खेळ सुरु केला त्यांना संपवावा लागेल; अमित शहांचं मोठं वक्तव्य!

Amit Shah: महाराष्ट्रात २०१९ मध्ये काय झाले? जर घड्याळाचे काटे मागे फिरवले तर तुम्ही संपूर्ण घटना वेगळ्या प्रकारे सांगू शकता का?, असा प्रश्न अमित शाह यांना विचारण्यात आला.
Amit Shah
Amit Shahesakal
Updated on

Amit Shah

महाराष्ट्रात २०१९ मध्ये मोठे राजकीय भूकंप घडले. भाजपला विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मतदान मिळाले. मात्र शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावरुन चर्चा फिस्कटली. त्यामुळे एकत्र लढलेली भाजप-शिवसेना वेगळे झाले. यावेळी शरद पवार यांनी राज्यात सत्ता स्थापनेत महत्वाची भूमिका बजावली. महाविकास आघाडीची स्थापनी झाली.

यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी मिळून सत्ता स्थापन केली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद देण्यात आले. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांचा अजित पवार यांच्यासोबत सकाळचा शपथवीधीचा कार्यक्रम फेल झाला होता. दरम्यान यावेळी नेमकं काय घडलं यावर अमित शाह यांनी माहिती दिली आहे.

Amit Shah
Who Is Ajay Taware: 'या' प्रकरणात देखील आमदार टिंगरेंचे नाव, अल्पवयीन आरोपीचे ब्लड रिपोर्ट बदलणारे डॉ अजय तावरे कोण ?

अमित शाह यांनी इंडियन एक्सप्रेसला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात २०१९ मध्ये काय झाले? जर घड्याळाचे काटे मागे फिरवले तर तुम्ही संपूर्ण घटना वेगळ्या प्रकारे सांगू शकता का?, असा प्रश्न अमित शाह यांना विचारण्यात आला.

अमित शाह म्हणाले, पण शेवटी आम्हीच होतो. 2019 च्या निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुका झाल्या तेव्हा आम्हाला बहुमत मिळाले. शरद पवारांनी आमचे मित्र उद्धव ठाकरे यांना आमच्यापासून तोडले. उद्धव ठाकरे आमचे मित्र होते. ज्यांनी हा खेळ सुरु केला त्याला संपवावा लागेल. त्यावेळी कोणतेही नैतिक प्रश्न उपस्थित केले गेले नाहीत.

उद्धव ठाकरेंना परत घेता येईल का? यावर अमित शाह म्हणाले, राज्यात आता आमची युती आहे आणि ती चांगली चालली आहे.

Amit Shah
Pune Porsche Accident: पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार! ससूनच्या दोन मोठ्या डॉक्टरांना अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.