राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला २०१७ मध्ये मोठा धक्का बसला होता. जेव्हा बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सातपैकी सहा नगरसेवकांनी निष्ठा बदलून शिवसेनेशी हातमिळवणी केली होती. त्यातील एकाने अमित ठाकरेंना त्यांना आलेल्या एका फोनबद्दल सांगितले. तो इतिहास आता अमित ठाकरेंनी पुन्हा गिरवला आहे. त्यावर प्रतिक्रिया देत तेव्हा नेमकं काय घडलं होतं हे सांगितलं आहे. तसेच तेव्हा झालेली राज ठाकरेंची अवस्थाही त्यांनी सांगितली आहे.
अमित ठाकरे यांनी सांगितले की, राजकारणात येणाऱ्या नव्या लोकांनी दोन गोष्टी पाळल्या पाहिजेत. त्या म्हणजे संयम आणि निष्ठा. तुम्हाला पटलेल्या विचारांसोबत तुम्ही राहायला हवं आहे. शिवसेनेत दोन गट पडले. यावर ते म्हणाले की, यावर मी बोलणं बंद केले आहे. कारण हा प्रश्न २०१९ पासून सुरू झाला आहे. आपण कुणाच्या नावावर प्रचार केला. आपण कोणत्या मुद्द्यांवर प्रचार केला. तुम्ही हे मुद्दे सोडून आणि बाळासाहेबांचे विचार सोडून मुख्यमंत्री पदासाठी पक्ष बदलत असाल तर हा प्रश्न इथूनच सुरू झाला आहे.
मनसेचे काही नगरसेवक पक्ष सोडून गेले होते. यावर ते म्हणाले की, ते नगरसेवक सोडून गेले नव्हते तो फोडले होते. आमच्या त्या ७ नगरसेवकांना किती खोके दिले ते मला माहित आहे. त्यातील सातवे संजय तोडे त्यांनी मला सांगितलं होतं. मलाही बोलवलं होतं पण मी गेलो नाही. मलाही तो फोन आला होता. त्यामुळे तेव्हा माझे वडील कशातून गेले असतील हे समजू शकतो. तुम्ही मागितले असते तर साहेबांनी दिले असते. त्यावेळी मी तर आजारी होतो. मात्र मी वडिलांना पाहत होतो. मला माहित होतं या गोष्टींचा त्यांच्यावर फरक नाही पडणार. आम्ही दोघेही घाबरत नाही. मात्र तत्वे पाळली गेली नाही, असं ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.