मुंबई : लोकसभा निवडणुकीचा फिवर आता चांगलाच चढायला लागला आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर खासदार गजानन किर्तीकर हे सध्या शिंदेंसोबत आहेत तर त्यांचे पुत्र अमोल किर्तीकर हे ठाकरेंसोबत आहेत.
गजानन किर्तीकर यांना पुन्हा एकदा लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. पण त्याचे पुत्र अमोल किर्तीकर यांनी आपल्यावडिलांविरोधात शड्डू ठोकला आहे. ठाकरे गटाकडून आपण लोकसभा लढवण्यावर ते ठाम आहेत. (amol kirtikar determined to contest lok sabha from uddahv thackeray group gajanan kirtikar may withdraw from election)
अमोल किर्तीकर यांची वडील गजानन किर्तीकर यांच्याकडून समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण ते आपल्या निर्णयावर ठाम आहेत. त्यामुळं गजानन किर्तीकर हेच एक पाऊल मागे घेऊन निवडणुकीतून माघार घेणार आहेत. जर अमोल किर्तीकर लढणार असेल तर आपण लढणार नाही असं त्यांनी पक्षाला सांगितलं आहे. यामुळं शिंदे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. एबीपी माझानं याबाबत वृत्त दिलं आहे. (Latest Marathi News)
दरम्यान, दक्षिण मुंबईतील जागा सोडल्यास भाजपनं इतर सर्व जागांवर दावा केला आहे. दक्षिण मुंबईत यशवंत जाधव यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. या परिस्थितीत गजानन किर्तीकर यांनी माघार घेतल्यास ही जागा शिंदेंच्या शिवसेनेकडं राहणार की भाजपकडं जाणार हे पहावं लागणार आहे. (Marathi Tajya Batmya)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.