Amol Kolhe: "आभाळ बघून जमीन नांगरायची..."; भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांवर अमोल कोल्हेंचं सडेतोड उत्तर

अजित पवार यांनी बंड केल्यानं राष्ट्रवादीत आता दोन गट पडले आहेत. यांपैकी अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह सत्तेत सहभागी झालेत.
Amol Kolhe_Khupte tithe Gupte
Amol Kolhe_Khupte tithe Gupte
Updated on

मुंबई : राज्याच्या राजकारण सध्या खूपच अस्थिर बनलं आहे. कोणता आमदार कोणाला समर्थन देईल, कुठल्या पक्षात जाईल याचा काही नेम नाही. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्याबाबत अशीच चर्चा सुरु असून ते भाजपत जाणार असल्याचं बोललं जात आहे.

या चर्चांवर खुद्द त्यांनीच सडेतोड उत्तर दिलं आहे. खुपते तिथं गुप्ते या कार्यक्रमात त्यांनी प्रश्नांना थेटपणे उत्तरं दिली. (Amol Kolhe response to talks of joining BJP at TV programme Khupte tithe Gupte)

Amol Kolhe_Khupte tithe Gupte
Monsoon Session 2023 : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मविआत धुसफूस; राष्ट्रवादीवर काँग्रेसची नाराजी?

'खुपते तिथं गुप्ते' कार्यक्रमात हजेरी

अभिनेते, दिग्दर्शक आणि संगितकार अवधुत गुप्ते यांचा 'खुपते तिथं गुप्ते' या शोमध्ये खासदार अमोल कोल्हे हे सहभागी झाले आहेत. या भागाचा एपिसोड अद्याप प्रदर्शित झालेला नाही. पण त्याचा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये कोल्हे काही प्रश्नांवर थेटपणे उत्तरं देताना दिसतात. (Latest Marathi News)

Amol Kolhe_Khupte tithe Gupte
Opposition Meet: बंगळुरुतील विरोधकांच्या बैठकीत होणार 'नवी आघाडी'; युपीएचं नाव बदलणार?

आधी आभाळ बघून मग...

गुप्ते कोल्हेबाबत बोलताना म्हणाले, "अमोल कोल्हे भाजपसोबत जाणार याबाबत लोक पैज लावत असतात. लहान मुलंही ठाम आहेत की आता कोल्हेंचा एक पाय भाजपमध्ये आहे. त्यावर उत्तर देताना कोल्हे म्हणाले, शेतकऱ्याचा पोरगा आहे त्यामुळं उगाच नांगर खाद्यावर घेऊन चालणार नाही. (Marathi Tajya Batmya)

आधी आभाळ बघून, मग जमीन कधी नांगरायची हे ठरवावं लागतं. पण हे राजकीय उत्तर आहे, पण खरं उत्तर हे आहे की...." या लाईनवरच प्रोमो कापण्यात आला आहे. त्यामुळं हा संपूर्ण कार्यक्रम प्रदर्शित झाल्यावरच त्यांनी नेमकं काय म्हटलंय हे कळू शकणार आहे.

Amol Kolhe_Khupte tithe Gupte
Monsoon Session 2023 : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मविआत धुसफूस; राष्ट्रवादीवर काँग्रेसची नाराजी?

मी येतो तेव्हा लोकांना कळतं...

दरम्यान, केईएमच्या मेडिकल कॉलेजच्या तुमच्या बॅचचं गेटटुगेदर नक्कीच होत असणार. यांपैकी बरेच जण चांगले डॉक्टर झालेले असतील पण त्यांचा 'पर डे' अर्थात दररोजचं मानधन जास्त असतं की तुमचं? या प्रश्नावरही कोल्हेंनी अगदी मार्मिक उत्तर दिलं आहे.

पर डे त्यांचा जास्त असतो पण तेव्हा जेव्हा ते बाहेर जातात तेव्हा त्यांना आपलं व्हिजिटिंग कार्ड द्यावं लागतं. पण जेव्हा मी जातो तेव्हा मी येतोय हे लोकांना कळतं" असं त्यांनी प्रोमोमध्ये म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()