मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील १८८ वर्षांचा जुना अमृतांजन पूल पाडण्यासाठी रेल्वेच्या कस्टोडियन विभागाने परवानगी दिली आहे. त्यासाठी निविदा मागवून फेब्रुवारीपासून हा पूल पाडण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. हे काम सहा महिने चालेल, असे सांगण्यात आले. एक्स्प्रेस-वे बांधण्यासाठी या पुलाचा अभ्यास करण्यात आला होता.
महत्वाची बातमी मेट्रो स्थानक भाड्याने देणे आहे
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी आणि अपघातांचे एक कारण ठरणारा अमृतांजन पूल पाडण्याचा विचार राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) अनेक वर्षांपासून करत आहे. हा पूल भारतीय रेल्वेच्या कस्टोडियन विभागाच्या ताब्यात आहे. या विभागाची परवानगी न घेताच एमएसआरडीसी पुलाच्या पाडकामासाठी निविदा मागवत असल्याने प्रतिसाद मिळत नव्हता. अखेरीस एमएसआरडीसीने रेल्वेकडे परवानगी मागितली. त्यानुसार रेल्वेच्या कस्टोडियन विभागाने पूल पाडण्यास परवानगी दिली आहे.
हे देखील वाचा हजार परत मिळवण्याच्या नादात लाख गमावले
लोणावळा आणि खंडाळ्यादरम्यान १८३० मध्ये हा पूल बांधण्यात आला. या पुलाचे काही खांब द्रुतगती मार्गाच्या मधोमध असल्याने ‘एस’ आकाराचे वळण आहे. एक्स्प्रेस-वेवरून वाहने सुसाट जात असताना अनेकदा या वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने अपघात होतात. हे अपघात कसे रोखता येतील, याबाबत एमएसआरडीसीचे अधिकारी दोन वर्षांपासून अभ्यास करत होते. त्यासाठी हा पूल पाडण्याशिवाय अन्य पर्याय नसल्याचा निष्कर्ष अहवालात काढण्यात आला आहे.
महत्वाचे कमळाच्या फुलांची प्रदूषणावर मात
१८७ वर्षांपूर्वी मुंबई-लोणावळा रेल्वेमार्गावरील हा पूल अवघ्या ३५२ दिवसांत बांधून पूर्ण करण्यात आला होता. हा पूल पाडण्यासाठी बांधकामाच्या निम्मा वेळ लागणार आहे. या पुलावर अमृतांजन पेन बामची महाकाय जाहिरात लावण्यात आली होती; त्यामुळे त्याला अमृतांजन पूल असे नाव पडले होते.
पूल पाडणे व त्यानंतर राडारोडा उचलणे या कामाला सहा महिने लागण्याची शक्यता आहे. या पुलाजवळून जाणारी हिंदुस्तान पेट्रोलियम्स कॉर्पोरेशनची पाईपलाईन हटवण्याची सूचना देण्यात आली आहे. हे काम पूर्ण झाल्यावर पूल पाडण्याचे काम सुरु केले जाईल.
- ए. नागरगोजे, अधीक्षक अभियंता, एमएसआरडीसी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.