अलिबागमधील अमूल्य ठेवा सापडला

अलिबागमधील अमूल्य ठेवा सापडला
Updated on

अलिबाग: तालुक्‍यातील आगरकोट किल्ल्यातून १५ दिवसांपूर्वी एका तोफेची चोरी झाली होती. रेवदंडा पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या किल्ल्यातून हा ऐतिहासिक ठेवा गायब झाल्याने पोलिसांवर जोरदार टीका सुरू होती. मात्र ती किल्ल्यापासून आठ किलामीटरवर वावे-रेवदंडा मार्गावरील आंबेपूर फाट्याजवळ मोकळ्या जागी सापडली आहे.
 
अलिबाग शहरापासून १७ किलो मीटरवर रेवदंड्यामध्ये पोर्तुगीजकालीन आगरकोट किल्ला आहे.  नैसर्गिक सौंदर्य, वैशिष्ट्यपूर्ण अशा समुद्रकिनाऱ्यामुळे हा परिसर महत्त्वाचा होता. १५०५ मध्ये पोर्तुगीज चौलमध्ये आले. त्यानंतर त्यांनी रेवदंड्यात आगरकोट किल्ला बांधला. त्यामध्ये ३६ तोफा असल्याचे समजते. त्यामधील मंदिराच्या शेजारी असलेल्या पिंपळाखालील एक तोफ १४ नोव्हेंबरच्या  रात्री गायब झाली. 

काही दुर्गप्रेमींनी या चोरीबाबत रेवदंडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, तब्बल १५ दिवस उलटूनही तोफचोरीची दखल घेतली नसल्याने दुर्गप्रेमींमध्ये असंतोष निर्माण झाला होता. अखेर पुरातत्त्व विभागाचे अधिकारी गोपाळ बिराडे यांनी तोफ चोरीला गेल्याची तक्रार २ डिसेंबरला रेवदंडा पोलिस ठाण्यात केली. 

पोलिस तपास सुरू असतानाच वावे-रेवदंडा मार्गावरील सराईजवळील आंबेपूर फाटा येथे रस्त्याच्या बाजूलाच ही तोफ सापडली. पोलिस निरीक्षक सुनील जैतापूरकर, उपनिरीक्षक हिंगे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता एक तोफ वडाच्या झाडाखाली पडलेली दिसून आली. त्यामुळे दुर्गप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे. पोलिसांनी हा ऐतिहासिक ठेवा ताब्यात घेतला आहे. लवकरच तो किल्ल्यात नेण्यात येणार आहे. 
दरम्यान किल्ल्यातील तोफांची सुरक्षा करण्याचे आवाहन दुर्गप्रेमींनी सरकारला केले आहे.

...आणि प्रयत्न फसला 
आंबेपूर फाट्याजवळ सापडलेली तोफ स्थानिकांच्या मदतीने रेवदंडा पोलिस ठाण्यात ठेवण्यात आली आहे. शोभेची वस्तू म्हणून ठेवण्यासाठी तोफेची चोरी झाल्याचा अंदाज आहे.
तरच ही मोहीम यशस्वी होईल.
- किशोर अनुभवणे, रहिवाशी, अलिबाग

शहरातील डासांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अलिबाग पालिकेने प्रायोगिक तत्त्वावर आधुनिक साधनसामग्रीच्या आधारे डासफवारणी सुरू केली आहे. महिनाभरात चांगले परिणाम दिसून आल्यास हा उपक्रम पुढेही सुरू ठेवण्यात येणार आहे. 
- महेश चौधरी, मुख्याधिकारी, अलिबाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.