जाणून घ्या, काय आहे मुंबई पोलिसांची 'संडे स्ट्रीट' संकल्पना?

मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्या संकल्पनेतून दर रविवारी 'संडे स्ट्रीट' हा अभिनव उपक्रम राबवला जाणार आहे.
Sunday Street
Sunday Streetसकाळ डिजिटल टीम
Updated on

मुंबईकरांना तणावमुक्त करण्यासाठी मुंबई पोलिसांनी पुढाकार घेतलाय. मुंबई पोलिसांकडून एक खास संकल्पना राबवली जात आहे. रस्त्यावर उतरून मनोरंजन, योग, स्केटींग, सायकलिंगसह सांस्कृतिक उपक्रमांचा लाभ घेता यावा यासाठी मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्या संकल्पनेतून दर रविवारी 'संडे स्ट्रीट' हा अभिनव उपक्रम राबवला जाणार आहे. रविवारपासून सकाळी ६ ते १० एकेरी मार्गावरती मुंबईतील १३ मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवत हे उपक्रम राबविले जाणार आहे. यासंदर्भात पोलिस अधिकाऱ्यांसह समाजातील विविध घटकांनी प्रतिक्रिया दिल्या. (An innovative project Sunday Street will be implemented every Sunday under the concept of Mumbai Police)

'संडे स्ट्रीट' अभिनव उपक्रम राबविण्यामागे प्रमुख संकल्पना काय?

कोरोना काळात लोक गर्दीच्या ठिकाणांपासून दूर होते. आता कोरोना संसर्ग कमी झालेला दिसुन येतोय, त्यामुळे लोक बाहेर पडत आहेत. मुंबईच्या खुल्या रस्त्यावर हा उपक्रम सुरू करण्याची हीच योग्य वेळ आहे.

- पोलिस अधिकारी

मुंबईतील १३ मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवत असल्याने वाहनचालकांना गैरसोय होणार नाही का?

आम्ही या उपक्रमासाठी मरीन ड्राइव्ह, वांद्रे बँडस्टँड, ओशिवरा, बोरिवली आणि मुलुंड यासह 13 मार्ग निवडले. जे रविवारी सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत बंद असणार या कालावधीत वाहनचालकांसाठी दुसऱ्या रस्त्यांची सोय केली करण्यात आली आहे.

- राजवर्धन सिन्हा, सहआयुक्त, ट्रॅफिक

Sunday Street
एमसीएने थकवले 14.82 कोटी तरी मुंबई पोलिसांची IPL ला कडक सुरक्षा

ही संकल्पना कशी सुचली?

या संडे स्ट्रीट' हा अभिनव उपक्रमाची प्रेरणा १९७४ मध्ये बोगोटा, कोलंबिया येथे सुरू झालेल्या 'सिक्लोव्हिया' पासून घेण्यात आली. आता दर रविवारी आणि राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशी हा उपक्रम राबविला जाणार. हे पर्यटनासाठी एक उत्तम आकर्षण आहे. रस्ते हेसर्वात मोठे नेटवर्क आहे, जेथे लोक चालतात, भेटतात, संवाद साधतात, व्यवसाय करतात आणि उत्सव साजरा करतात.

- धवल आशर, वाहतूक तज्ज्ञ

Sunday Street
Video: भिंतीला धडकून दुचाकीस्वाराचा अपघात; दुचाकीसह पडला नाल्यात

'संडे स्ट्रीट' उपक्रमाकडे तु्म्ही कसे बघता?

"आम्ही एका क्यूबिकल्समध्ये जगतो. अपार्टमेंटमधून कारमध्ये, नंतर ऑफिसच्या लिफ्टपासून ऑफिसच्या डेस्कपर्यंत आणि घरी परततो. आपण क्वचितच मोकळ्या जागेत पाऊल टाकत असतो. कोणताही प्रकल्प जो शारीरिक मनोबल वाढवतो आणि प्रदूषणाला कमी करण्याचा उद्देश ठेवतो, त्या प्रकल्पाला प्रोत्साहन दिले पाहिजे.

- संजय गावकर

सदस्य, मुलुंड रहिवासी गट

यापुर्वी असा उपक्रम राबविण्यात आला होता का?

दोन वर्षांपासून असाच उपक्रम अंधेरीतील लोखंडवाला बॅक रोडवर सुरू होता. प्रत्येक महिन्याच्या तिसर्‍या रविवारी फूड स्टॉल्स, अॅक्टिव्हिटी स्टॉल्स, गेम झोन, स्ट्रीट परफॉर्मन्स, ट्री क्लाइंबिंग सेशन देखील होते. लोखंडवालामध्ये जवळपास प्रत्येक कुटुंबाकडे अनेक वाहने आहेत. धेरीतील लोखंडवाला बॅक रोड ही एकमेव जागा होती जिथे लोक स्वतःला व्यक्त करू शकत होते. याला उत्तम प्रतिसाद मिळाला होता.

- करण जोतवानी

लोखंडवाला- ओशिवारा नागरीक

Sunday Street
IPL 2022 : सलामीची लढत कोण जिंकणार?

हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडण्याकरीता तुम्ही काय दक्षता घेण्यास सांगणार?

या उपक्रमासाठी जे १३ मार्ग निवडण्यात आले आहेत. त्या १३ ठिकाणी खड्डे किंवा रस्त्यांची कामे नसावीत. सोबत त्या रस्त्यांनी प्रवेश करणाऱ्यांसाठी दुसऱ्या मार्गांची सोय करावी, जेणे करुन नागरिकांना याचा त्रास होणार नाही.

- इंद्राणी मलकानी,

कार्यकर्त्या मलबार हिल ALM

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.